Wednesday, September 11, 2024
Homeकृषिआमदार अशोक पवार यांनी सणसवाडीतील ४८ तासात बसवला ट्रान्सफॉर्मर

आमदार अशोक पवार यांनी सणसवाडीतील ४८ तासात बसवला ट्रान्सफॉर्मर

कोरेगांव भीमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील सोनकाई मळ्यातील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने शेतकरी व नागरिकांचे मोठी गैरसोय झाली होती. ऐन उन्हाच्या झळा बसत असल्याने लहान मुले , वृध्द व महिला भगिनी यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. ट्रान्सफॉर्मर जळाल्याने स्थानिक नागरिकांनी माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नागरिकांची समस्या समजून घेत आमदार अशोक पवार यांच्याशी संपर्क साधत नागरिकांची अडचण सांगितली यावर आमदार अशोक पवार यांनी तातडीने ट्रान्सफॉर्मर समस्या सोडवू असे आश्वासन दिले.

 आमदार अशोक पवार यांनी वीजवितरण महामंडळाने शिक्रपुरचे उपकार्यकारी अभियंता  नितीन महाजन यांना याबाबत सूचना केली यावर महाजन साहेब यांनी सहाय्यक अभियंता बसवराज बिराजदार, वरिष्ठ तंत्रज्ञ बी एच आहेरकर, एम आय तडवी  यांच्या माध्यमातून ट्रांसफार्मर बसवण्यात आला.यामुळे नागरिकांनी आमदार अशोक पवार, माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, वीज वितरण मंडळाचे कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!