सणसवाडी येथे आमदार अशोक पवार यांनी केले व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे डी पी चे उद्घाटन,नागरिकांनी मानले आभार
कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील नागरिकांची मागील अनेक दिवसांपासून डी पि बसवण्याची मागणी होती.याबाबत आमदार अशोक पवार यांच्याशी संपर्क करत केला असता नागरिकांची समस्या व गरज समजून घेत तातडीने डी पि उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले.यावेळी वीज महामंडळाचे शिक्रापूर उपविभाग उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी प्रत्यक्ष येऊन डी पि बसवली तर आमदार अशोक पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे नागरिकांशी संवाद साधला व ऑनलाईन उद्घाटन केले.
सणसवाडी येथील साईनाथ नगर व वसेवाडी गावठाण येथील नागरिकांची मागील अनेक दिवसांपासून विजेची समस्या होती.शेती, घरगुती वापर व दैनंदिन वापरासाठी विजेची सातत्याने मोठी गरज भासत होती.यावेळी डी पि कमी एच पि ची असल्याने अनेकदा नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते.
याबाबत सणसवाडी येथील नागरिकांनी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आमदार अशोक पवार यांना याबाबत नागरिकांची अडचण सांगितली व तातडीने डी पि उपलब्ध करून देण्याची विनंती केली असता आमदार अशोक पवार यांनी डी पि डी सी च्या माध्यमातून साईनाथ नगर व वसेवाडी गावठाण यांना प्रत्येकी १०० एच पि ची डी पि उपलब्ध करून दिली.
यावेळी आमदार अशोक पवार यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संपर्क केला असता त्यांनी शिक्रापूर उपअभियंता नितीन महाजन यांचे व एम एस सी बी विभागाचे काम प्रामाणिक असल्याचे सांगत इमारती व त्यासमोर लोंबकळणाऱ्या तारांवर उपाय करायला हवा असे सुचवले असता उपअभियंता नितीन महाजन यांनी तातडीने सर्व्हे करून पंच केबल बसवण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. आमदार पवार यांनी येथील नागरिकांशी संवाद साधला यावेळी नागरिकांनी व विशेषतः महिला भगिनींनी आमदार अशोक पवार यांचे आभार मानत टाळ्यांचा कडकडाट केला. तसेच डिपी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्रापूर उपविभागाचे अभियंता नितीन महाजन व एम एस सी बी कर्मचाऱ्यांचा यावेळी नग्रिकांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य पंडित दरेकर शिक्रापूर उपविभाग उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन, कोरेगाव भीमा सहाय्यक अभियंता बाळासाहेब टेंगळे, ग्रामपंचायत सदस्या ललिता दरेकर, डॉ. हेमंत वाघोलीकर, उद्योजक नवनाथ दरेकर, युवा कार्यकर्ते निलेश दरेकर उद्योजक विठ्ठल दरेकर, बाळकृष्ण दरेकर,जालिंदर कासार, दीपक माने, समाधान कासार, महादेव चव्हाण, संजय नरोडे, महेश कुरे, विनोद सातव, दत्ता पारने ,संजय घाडगे ,संजय आखूड, राणी हरगुडे ,राणी भोसले ,स्वाती घायतडकर, श्यामल दमामे ,पद्मा पुजारी, रेणुका कुरे, अर्चना कासार, सुनिता गायकवाड आदी उपस्थित होते.