सणसवाडी येथील नागरिकांनी आमदार अशोक पवार यांचे मानले आभार
कोरेगाव भीमा – सणसवाडी (ता.शिरूर) सराटी वस्ती येथील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने शेतकरी व नागरिकांचे मोठी गैरसोय झाली होती. पावसाचे दिवस त्यात मुलांच्या शाळा सुरू झालेल्या असून विद्यार्थी , नागरिक महिला भगिनी यांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत होते तसेच शेतकऱ्यांची गैरसोय होत होती. याबाबत नागरिकांनी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर व सणसवाडी ग्राम पंचायतीचे उपसरपंच दत्तात्रय हरगुडे यांना आपली समस्या सांगितली यावर संबंधितांनी तातडीने आमदार अशोक पवार (MLA Ashok Pawar)यांना नागरिकांच्या अडचणींबाबत माहिती देत नागरिकांची समस्या सोडवण्याची विनंती केली.
नागरिकांची समस्या पाहून आमदार अशोक पवार यांना यांनी वीजवितरण महामंडळाचे (MSCB)अधिकारी नितीन महाजन यांना ट्रांसफार्मर दुरुस्त करण्याची सूचना केली. यावर तातडीने महाजन यांनी कार्यवाही करीत दोन दिवसात ट्रान्सफॉर्म बसवला त्यामुळे शेतकरी व स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त करत आमदार आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, उपसरपंच दत्तात्रय हरगुडे व महावितरणचे नितीन महाजन व कर्मचारी यांचे आभार मानले.