Friday, June 21, 2024
Homeताज्या बातम्याआमदार अशोक पवार यांना सणसवाडी करांनी दिल्या दिवाळी व पाडव्याच्या ...

आमदार अशोक पवार यांना सणसवाडी करांनी दिल्या दिवाळी व पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

वडगाव रासाई येथे भेट देत ग्रामस्थांनी जपला स्नेहबंध

कोरेगाव भीमा – आमदार ॲड अशोक पवार यांनी आपल्या विकास कामांच्या माध्यमातून शिरूर हवेली मतदार संघातील नागरिकांना जास्तीत जास्त सुख सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करत असतात . त्यांच्या कार्यकर्तृत्वावर नेहमी सर्वसामान्य नागरिक खुश असल्याचे दिसते याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली असून सणसवाडी ग्रामस्थांनी वडगाव रासाई (ता.शिरूर) येथील आमदार अशोक पवार यांच्या निवासस्थानी माजी सभापती सुजाता पवार यांना दिवाळी पाडव्यानिमित्त भेट देत शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

आमदार ॲड अशोक पवार यांच्यावर निरपेक्ष प्रेम करणारे गाव म्हणजे उद्योगनगरी सणसवाडी गाव अशी तालुक्यात ओळख असून आमदार अशोक पवार यांचेही या गावाशी मनाचे नाते अतूट असल्याचे वेळोवेळी दिसत असते. आमदार ॲड अशोक पवार,माजी सभापती सुजाता पवार यांना सणसवाडी ग्रामस्थांनी दिवाळीच्या व पाडव्याच्या शुभेच्छा देत दरवर्षी होणारा स्नेहबंध जपला असून आमदार दांपत्याने सणसवाडी करांसह मतदार संघातील आलेल्या स्नेहिजनांचे स्वागत करत दिवाळी फराळ व स्नेहभेट समारंभ उत्साहात पार पडला.

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य पंडित दरेकर ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष पुणे जिल्हा माऊली थेऊकर ,ग्रामपंचायत सदस्या ललिता दरेकर माजी सरपंच नवनाथ माळी हनुमंत दरेकर, सुभाष दरेकर, निलेश दरेकर,विठ्ठल दरेकर, संतोष दरेकर, बाळकृष्ण दरेकर , रविराज जुनवणे ,उत्तम दरेकर ,अशोक करडे, अशोक ढेरंगे, संतोष शेळके, सलीम खान,सुनिता दरेकर, वंदना दरेकर, मंगल शेळके,सारीका गोटे, मयुर दरेकर,सागर गव्हाणे ,अनिल गोटे,रामेश्वर पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!