Saturday, July 27, 2024
Homeस्थानिक वार्ताआमदार अशोक पवार यांना दिवाळीच्या दिल्या सणसवाडी करांनी शुभेच्छा

आमदार अशोक पवार यांना दिवाळीच्या दिल्या सणसवाडी करांनी शुभेच्छा


वडगाव रासाई येथे भेट देत ग्रामस्थांनी जपला स्नेहबंध

कोरेगाव भीमा – आमदार ॲड अशोक पवार यांनी आपल्या विकास कामांच्या माध्यमातून शिरूर हवेली मतदार संघातील नागरिकांना जास्तीत जास्त सुख सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करत असतात . त्यांच्या कार्यकर्तृत्वावर नेहमी सर्वसामान्य नागरिक खुश असल्याचे दिसते याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली असून सणसवाडी ग्रामस्थांनी वडगाव रासाई (ता.शिरूर) येथील आमदार अशोक पवार यांच्या निवासस्थानी माजी सभापती सुजाता पवार व युवा नेतृत्व ऋषिराज पवार यांना दिवाळी पडव्यानिमित्त भेट देत शुभेच्छांचा वर्षाव केला.

    आमदार ॲड अशोक पवार यांच्यावर निरपेक्ष प्रेम करणारे गाव म्हणजे उद्योगनगरी सणसवाडी  गाव अशी तालुक्यात ओळख असून आमदार अशोक पवार यांचेही या गावाशी मनाचे नाते अतूट असल्याचे वेळोवेळी दिसत असते.

आमदार ॲड अशोक पवार,माजी सभापती सुजाता पवार व युवा नेते ऋषिरज पवार यांना सणसवाडी ग्रामस्थांनी दिवाळीच्या व पाडव्याच्या शुभेच्छा देत दरवर्षी होणारा स्नेहबंध जपला असून आमदार दांपत्याने सणसवाडी करांसह मतदार संघातील आलेल्या स्नेहिजनांचे स्वागत करत दिवाळी फराळ व स्नेहभोजन समारंभ उत्साहात पार पडला.
यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, माजी चेअरमन सुहास दरेकर, प्रशांत दरेकर, वंदना दरेकर‌, राणी करडे, सुभाष दरेकर, निलेश दरेकर, सुखदेव दरेकर, राविराज जुनवणे , प्राध्यापक अनिल गोटे , अशोक करडे ,हनुमान दरेकर ,विजय दरेकर ,संदिप दरेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!