Sunday, October 27, 2024
Homeस्थानिक वार्ताआमदार अशोक पवार यांच्या हस्ते सणसवाडी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन

आमदार अशोक पवार यांच्या हस्ते सणसवाडी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन

२५ वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याने नागरिकांनी केला आमदार पवार यांचा नागरी सत्कार

कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर) येथील ग्राम पंचायत यांच्या माध्यमातून विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन आमदार ॲड. अशोक पवार यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. उद्योगनगरी सणसवाडीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रस्त्याच्या समस्येमुळे नागरिक व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती गावच्या मध्यवर्ती असणाऱ्या अत्यावश्यक रस्त्याची दुरावस्था असल्याने अनेक नागरिकांची रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत हाती.

यावेळी ग्राम पंचायत सणसवाडी ते बाप्पु अण्णा वस्ती येथील मागील २५ वर्षांपासून प्रलंबित असणारा रस्त्याचा प्रश्न सरपंच संगीता नवनाथ हरगूडे व उपसरपंच दत्तात्रय हरगूडे व आमदार अशोक पवार यांनी मार्गी लावला असल्याने ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून नागरिकांना अनोखी दिवाळीची भेट मिळाली असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत या रस्त्याचा प्रश्न सुटल्याने तेथील नागरिकांनी सरपंच संगीता नवनाथ हरगुडे व उपसरपंच दत्तात्रय हरगुडे यांचे विशेष आभार मानले.

आमदार अशोक पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेली विविध विकासकामे -१) ग्राम पंचायत सणसवाडी ते बाप्पु अण्णा वस्ती रस्ता काँक्रिटिकरण करणे – ४८ लक्ष२) सराटी वस्ती ते ग्राम पंचायतपर्यंत काँक्रिट करणे.( ३ टप्पे ) १.८० लक्ष३) सराटीवस्ती ररस्ता ते हरगूडे वस्ती (सभापती वस्ती) मेनरोड पर्यंत रस्ता काँक्रिट व डांबरी करणेउद्घाटन करण्यात आलेली विकास कामे (२ टप्पे) १.४० लक्ष४) सराटी वस्ती येथे उंच पाण्याची टाकी बांधणे – ४० लक्ष५) डोंगर वस्ती येथे उंच पाण्याची टाकी बांधणे – ४० लक्ष६)मौजे सणसवाडी येथील मयूरी रेसिडेन्सी येथील परिसर सुधारणा करणे -९ लक्ष

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, माजी उपसभापती आनंदराव हरगूडे, माजी संचालक दत्तात्रय हरगूडे, मनसे पुणे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर, एम सी बी चे शिक्रापूर उप कार्यकारी अभियंता नितीन महाजन, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, सरपंच संगीता नवनाथ हरगूडे,उपसरपंच दत्तात्रय हरगूडे,माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर, माजी सरपंच स्नेहल भुजबळ, माजी उपसरपंच विजयराज दरेकर, ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, सागर दरेकर,अक्षय कानडे , शशिकला सातपुते, ललिता दरेकर, रुपाली दरेकर, सुवर्णा रामदास दरेकर ,सुनीता दरेकर, माजी चेअरमन सुहास दरेकर, उद्योजक नवनाथ दरेकर,माजी उपसरपंच नवनाथ भुजबळ,माजी ग्राम पंचायत सदस्य रामभाऊ दरेकर, सुभाष दरेकर, निलेश दरेकर, शाम दरेकर, प्रा.अनिल गोटे,उपाध्यक्ष अशोक करडे,रविराज जूनवणे,पंढरीनाथ गोरडे, श्रीधर हरगूडे, राहुल नांगरे, बाळासाहेब भोसले मान्यवर उपस्थित होते.फोटो ओळ – सणसवाडी येथील विविध विकास कामांच्या प्रसंगी आमदार अशोक पवार व उपस्थित इतर मान्यवर

शिरूर तालुक्यातील औद्योगिक वसाहत असणाऱ्या ग्राम पंचायती पैकी सणसवाडी ग्राम पंचायतीचे काम उत्कृष्ट व प्रशंसनीय आहे ग्रामस्थ विकास कामांच्या बाबतीत कायम आग्रही असून मोठ्या प्रमाणात नागरिकांना सुख सुविधा देण्यासाठी कार्यतत्पर असल्याने सणसवाडी गावचा सर्वांगीण विकास होत आहे यासाठी सरपंच ,उपसरपंच येथील सर्व पदाधिकारी व नागरिकांचे करावे तितके कौतुक कमी आहे – आमदार अशोक पवार

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!