Wednesday, September 11, 2024
Homeताज्या बातम्याआमदार अशोक पवार यांच्या हस्ते दरेकरवाडी येथे सभामंडपाचे उद्घाटन

आमदार अशोक पवार यांच्या हस्ते दरेकरवाडी येथे सभामंडपाचे उद्घाटन

आमदार  अशोक पवार यांच्यामागे आम्ही ठामपणे उभे राहणार – मार्केट कमिटीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे

कोरेगाव भीमा – दरेकरवाडी  (ता.शिरूर) येथील तीस लाख रुपयांच्या सभामंडपाचे उद्घाटन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी मार्केट कमिटीचे माजी संचालकसंचालक दत्तात्रय हरगुडे यांनी आमदार अशोक पवार यांनी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांच्या सुखसुविधेसाठी व्यापक काम केले असून वरिष्ठ पातळीवरील राजकारण काहीही असो आम्ही सर्वजण आमदार अशोक पवार यांच्या मागे ठामपणे उभे राहणार असून मतदार संघाच्या सर्वांगीण विकासात सहभागी आहोत असे सांगत आम्ही आमदार अशोक पवार यांच्या सोबत आहोत असे सांगितले.

      सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील समस्या कमी करण्यासाठी,त्यांना सुखी समाधानी करण्यासाठी व त्यांच्या आयुष्यातील प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेचा उपयोग करायला हवा असे मत आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले.

      सर्वसामान्य जनता अशोक  पवार यांच्या बाजूनेच उभी राहील, त्यांनी तालुक्याचा विकास पाहिला ,हॉस्पिटल असो की कोरोना काळातील महत्त्वपूर्ण काम पाहिले असून सर्वांगीण विकासाच्या बाबतीत आमदार अशोक पवार यांचे काम अतुलनीय असल्याचे मत रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे व्हॉइस चेअरमन पोपट भुजबळ यांनी व्यक्त केले.

 दरेकरवाडी येथील सभामंडपाचे उद्घाटन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अशोक पवार यांनी सभामंडपासाठी तीस लाखांचा निधी उपलब्ध करून  दिल्याने उपस्थितांनी आमदार पवार यांचे आभार मानले.

 यावेळी  आमदार अशोक पवार , रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी  साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पोपट भुजबळ , कारखान्याचे संचालक विश्वास ढमढेरे, खरेदी विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे ,जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य पंडित दरेकर , मार्केट कमिटीचे माजी सदस्य दत्तात्रय हरगुडे ,पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर ,दरेकरवाडीचे सरपंच विक्रम दरेकर ,उपसरपंच  कमला दरेकर ,कात्रज दूध डेरीचे संचालक स्वप्निल ढमढेरे ,काँग्रेस शिरूर तालुकाध्यक्ष वैभव यादव , मार्केट कमिटीचे सदस्य सुदीप गुंदेचा, टिळकरवाडीचे सरपंच सुभाष लोणकर, माजी सरपंच ज्ञानेश्वर चकोर , ग्रामपंचायत सदस्या आशा भोसले, संगिता भोसले,माजी सरपंच शंकर दरेकर,तुकाराम दरेकर , चेअरमन तरसिंग दरेकर ,सणसवाडीचे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दरेकर , माजी उपसरपंच नवनाथ विश्वनाथ हरगुडे ,रामदास जवळकर, नवनाथ दरेकर, पोपट दरेकर ,युवा कार्यकर्ते निलेश दरेकर, अशोक ढेरंगे, प्रशांत बाबर ,माजी सरपंच बापुसाहेब भोसुरे , नामदेव नाथ अशोक भोरडे,मयुर दरेकर, मारुती कामठे, बाळासाहेब दरेकर, बापुसाहेब शेळके, विजय माशिरे व अन्य मान्यवर उपस्थित होते. 

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!