कोरेगाव भीमा – सणसवाडी (ता.शिरूर)
शिरूर तालुक्यातील प्रसिद्ध असणारे व उद्योगनगरी सणसवाडी (ता.शिरूर) नागरिकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र नरेश्वर मंदिर परिसरात महाशिवरात्री निमित्त आमदार अशोक पवार यांच्या हस्ते महाशिवरात्री निमित्त नरेश्वर मंदिर परिसरातील रस्ता व पेव्हींग ब्लॉक उद्घाटन करण्यात आले.
या सुविधेमुळे मोठ्या प्रमाणात एका ठिकाणी होणारी गर्दी टळली असून भाविक भक्तांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी एका रांगेत व सुखकर होणार असून वृद्धांना व लहान मुलांना पायऱ्यांनी दर्शनासाठी जाणे सुखकर झाले असून भाविकांनी याबाबत समाधान व आनंद व्यक्त केला.
श्री क्षेत्र नरेश्र्वर मंदिर सणसवाडी ( ता.शिरूर) पंचक्रोशीतील नागरिकांचे श्रद्धास्थान व आराध्य दैवत आहे. येथे डोंगरावरील शंभो महादेवाचे मंदिर, मागील बाजूस आकर्षक डोंगर, तळे, मंदिराच्या पायथ्याशी थंडगार पाण्याची विहीर, सुंदर ,आकर्षक बगीचा ( गार्डन) , लहान मुलांसाठी झोका,घसरगुंडी , विविध आकर्षक रंगाची फुले,झाडे यामुळे येथे भाविकभक्त,कामगार व वृद्ध , सहकुटुंब सहपरिवार नागरिक, तरुणाई मोठ्या प्रमाणात येत असतात.
सकाळी व संध्याकाळी येथे चालण्यासाठी मोठ्या संख्येने आजूबाजूचे नागरिक येत असतात यामुळे श्री क्षेत्र नरेश्वर मंदिर परिसर नेहमी वर्दळीचा व भाविक,नागरिक यांच्या गर्दीचा परिसर असतो. या विकास कामामुळे नागरिक व भाविकांना त्याचा लाभ होणार आहे.
यावेळी आमदार अशोक पवार ,माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर,यावेळी सरपंच संगीता हरगुडे, उपसरपंच दत्तात्रय हरगुडे,माजी पुणे जिल्हा नियोजन समिती पंडित दरेकर, माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, काँग्रेसचे वैभव यादव,माजी सरपंच रमेश सातपुते, सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ , माजी सरपंच सुरेश हरगुडे, गोरख दरेकर,सुहास दरेकर ,माजी उपसरपंच नवनाथहर गुडे शिवाजी दरेकर, नामदेव दरेकर, निलेश दरेकर , रामभाऊ दरेकर, सुभाष दरेकर, सुभाष दरेकर,प्रा.अनिल गोटे उपस्थित होते.