Friday, July 12, 2024
Homeस्थानिक वार्ताआमदार अशोक पवार यांच्या सुचेनेने सणसवाडी येथील एल अँड टी फाटा ते...

आमदार अशोक पवार यांच्या सुचेनेने सणसवाडी येथील एल अँड टी फाटा ते तळेगाव ढमढेरे रस्ता दुरुस्ती

कोरेगाव भीमा – सणसवाडी( ता.शिरूर) येथील एल अँड टी फाटा ते तळेगाव ढमढेरे रस्त्याची आमदार अशोक पवार यांच्या सूचेनेने दुरुस्ती सुरू करण्यात आले आहे.

या रस्त्यावरून कामगार ,विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.येथे असणाऱ्या उद्योग धंदयांमुळे येथे मालवाहतूक, तळेगाव ढमढेरे, मंडवगण फराटा, न्हावरे तसेच साखर कारखाना ,तळेगाव ढमढेरे येथील शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ व शासकीय रुग्णालय , उपनिबंधक कार्यालय तळेगाव ढमढेरे तसेच पिंपळे जगताप येथील उपबाजार समिती, गरुडझेप अँकॅडमी,नवोदय विद्यालय यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आल्याने नागरिकांसह विद्यार्थी, रूग्ण, व्यापारी,शेतकरी,यांचा प्रवास सुखकर होणार आहे.

सणसवाडी येथील एल अँड टी फाटा , फेबर कंपनी ते तळेगाव ढमढेरे रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आमदार अशोक पवार यांना सांगितले यावर तातडीने पि एम आर डी ए विभागाला सूचना करत रस्ता दुरुस्त केल्याची माहिती पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर यांनी दिली. तसेच या कामाबाबत आमदार अशोक पवार यांचे आभार मानले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!