Saturday, July 27, 2024
Homeराजकारणआमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सणसवाडी करांनी दिल्या शुभेच्छा

आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सणसवाडी करांनी दिल्या शुभेच्छा

सरपंच ,उपसरपंच व गावातील पदाधिकाऱ्यांसह प्रमुख कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित

एकाच वेळी एकाच गावातून ४५० ते ५०० हितचिंतकांनी दिल्या शुभेच्छा

कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर) या गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी एकाच वेळी ४५० ते ५०० जन एकत्र जात आमदार अशोक पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आमदार अशोक पवार यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी शिरूर – हवेली तालुक्यातील एकाच गावातील इतक्या मोठ्या संख्येने एकत्रित येणारे ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ व पक्षाचे कार्यकर्ते ,नेते यांची चर्चा मात्र सर्वत्र हित असून गावच्या एकीची व आमदार पवार यांच्या प्रेमाविषयी सणसवाडी गावाने कृतियुकत उदाहरण समोर ठेवले आहे.


राजकारणातून समाजाचे हित साधायचे,सर्व समाज घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावायचा,विकास दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करायचे आणि भविष्याचा अचूक वेध घेत नागरिकांना सोयीसुविधा पुरवत त्यांची कुटुंबातील घटकासारखी काळजी घेण्यासाठी आमदार अशोक पवार व सुजाता पवार यांनी सातत्याने केल्याने शिरूर हवेली तालुक्यातील जनता त्यांच्याविषयी प्रेम,आपुलकी व जिव्हाळा जपत असते.
याचेच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सणसवाडी गाव ,या गावाची एकी आणि आमदार पवार यांच्या वाढदिवशी ग्राम पंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ एकत्र येऊन अनोखी एकी व आमदार पवार यांच्याविषयी असणारे प्रेम त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
मोठ्या प्रमाणात वाहनांची सलग रांग, मोठ्या प्रमाणात एकत्र आलेले पदाधिकारी,नेते, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते , हातातील आकर्षक व मनमोहक पुष्पगुच्छ आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्रालय, आमदार पवार यांचा फोटो असलेला केक यामुळे सणसवाडी करांचे प्रेम आणि ते व्यक्त करण्याची स्टाईल वेगळी पण लक्षात राहण्यासारखी होती.


यावेळी पुणे जिल्हा नियोजनचे समितीचे सदस्य पंडित दरेकर, उद्योगनगरी सणसवाडीच्या सरपंच संगीता नवनाथ हरगुडे ,उपसरपंच दत्तात्रय हरगुडे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, अक्षय कानडे, माजी सरपंच सुनंदा दरेकर, स्नेहल भुजबळ ,ग्रामपंचायत सदस्या रूपाली दरेकर, सुवर्णा दरेकर, शशिकला सातपुते ,ललिता दरेकर ,सुनिता दरेकर, माजी उपसरपंच संभाजी साठे , चेअरमन सुहास दरेकर, सावता माळी परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ , माजी चेअरमन बबुशा दरेकर, गोरख दरेकर ,माजी उपसरपंच रमण दरेकर ,ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ दरेकर माजी चेअरमन मच्छिंद्र दरेकर, प्रशांत दरेकर, सुभाष दरेकर, नवनाथ दरेकर उद्योजक रामदास दरेकर, नवनाथ हरगुडे, निलेश दरेकर ,विष्णू हरगुडे, विठ्ठल दरेकर व अन्य मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार अशोक पवार यांच्या दर्जेदार गुणवत्तापूर्ण विकासकामे, कोरोणा काळात केलेले काम, हॉस्पिटल विषयी केलेले कार्य , रुग्णांच्या उपचाराची बिले, पूरग्रस्त भागातील बांधवांसाठी केलेले काम महत्वपूर्ण व मार्गदर्शक आहे. यामुळेच बरेच जण पक्ष व राजकारण यापलीकडे जाऊन आमदार अशूनपावर यांना मानतात व हीच खरी त्यांच्या कार्याची ताकद आहे. – पंडित दरेकर,सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!