Monday, June 17, 2024
Homeन्याययुवाआमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ४७० जणांना रोजगाराची संधी उपलब्ध

आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ४७० जणांना रोजगाराची संधी उपलब्ध

४५ कंपन्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग ऑनलाईन व ऑफलाईन मुलाखत, एकाच दिवशी जॉइनिंग लेटर देत अनोखा उपक्रम

कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर) येथील कृष्णलीला मंगल कार्यालयात आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ४५ कंपन्यांमध्ये ४७० तरुणाईला रोजगार संधी उपलब्ध झाल्याचीही पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर यांनी दिली. रांजणगाव , हिंजवडी,चाकण व सणसवाडी येथील ४५ नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता.

यावेळी आमदार अशोक पवार यांनी राज्यासह देशामध्ये मोठ्या प्रमाणात महागाई व बेरोजगारीची समस्या आहे. महागाईने नागरिकांचे हाल होत आहेत तर बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे.उच्च शिक्षण घेऊनही रोजगार मिळत नसेल तर तरुणाईचे मानसिक धैर्य खचत आहे त्यामुळे त्यांच्या जीवनावर परिणाम होत आहे असे मत व्यक्त केले.

आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर हवेली तालुक्यातील पात्रता धारक तरुणाईला रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन सागर निंबाळकर,संतोष दौंडकर,अमित गव्हाणेसुभाष गव्हाणे,अमित गव्हाणे यांनी केले होते.

यावेळी आमदार अशोक पवार ,राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा बँक व्हाइस चेअरमन सुनील चांदेरे,राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, युवानेते ऋषीराज पवार पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, सभापती मोनिका हरगुडे, ,बाजार समिती सभापती काका कोरेकर, माजी सभापती शंकर जांभळकर, खरेदी विक्री चेअरमन राजेंद्र नरवडे,माजी अध्यक्ष बाळासाहेब नरके,संचालक निखिल तांबे, संचालक स्वप्नील ढमढेरे, माजी सभापती विश्वास ढमढेरे,माजी सरपंच स्वप्नील गायकवाड, माजी उपसरपंच सागर दरेकर, रवींद्र फडतरे, शिरूर तालुका महिला अध्यक्षा विद्या भुजबळ, माजी सरपंच स्नेहल भुजबळ ग्रामपंचायत सदस्या ललिता दरेकर , माजी चेअरमन सुहास दरेकर, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ दरेकर , सुभाष दरेकर, निलेश दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

रोजगाराच्या समस्या बिकट होणार असून केंद्र व राज्य सरकारने लक्ष द्यावे महाराष्ट्रातून मोठे प्रकल्प इतर राज्यात जात असतील तर भविष्यात बेरोजगारीची समस्या आणखी बोलत होणार आहे.आमची बांधिलकी इथल्या मातीशी व नागरिकांशी आहे त्यामुळे आम्ही येथे आमच्या परीने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत प्रदीप गारटकर,अध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस

राज्यातील प्रकल्प इतर राज्यात असतील तर तरुणाईला रोजगार कसा मिळणार , त्याचबरोबर कौशल्यपूर्ण कामगार मिळवणे हे उद्योगक्षेत्रासमोरील आव्हान आहे. डिग्री पूर्ण झाली की लगेच मोठे पॅकेज मिळावे ही अपेक्षा ठेवत समोर असलेली रोजगाराची संधी सोडू नये ,त्यासाठी आवश्यक कौशल्य ,अनुभव , ज्ञान व कठोर परिश्रम घेत स्वताला सिद्ध करावे – आमदार अशोक पवार

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!