Friday, June 21, 2024
Homeस्थानिक वार्ताआमदार अशोक पवार यांच्या माणुसकीचे अनोखे दर्शन

आमदार अशोक पवार यांच्या माणुसकीचे अनोखे दर्शन


वाढदिवसाचे आनंदी क्षण साजरे करताना जपले समाज भान

कोरेगाव भीमा – आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्ते त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी व भेटण्यासाठी घरी गेले होते यावेळी आमदार पवार माणुसकीच्या दर्शनाने उपस्थित सर्व भारावून गेले.

     शिरूर हवेलीतील अनेक हितचिंतक व कार्यकर्ते आमदार पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना अचानक आमदार अशोक पवार यांना दहिवडी येथील रुग्णाचा कॉल आला त्यावेळी कार्यकर्ते व आप्तेष्टांच्या गराड्यातून बाहेर पडत आमदार पवार यांनी समोरील व्यक्तीची वैद्यकीय मदतीची व रुग्णालयाचे बिल कमी करण्याचे बोलताच आमदार पवार यांनी संबधित माऊलीनाथ हॉस्पिटल यांच्याशी संपर्क साधत तातडीने बिल कमी केले. यामुळे संबधित नागरिक अत्यंत भारावून गेला व त्याच्यासह उपस्थित असणाऱ्या सर्वांना आमदार अशोक पवार यांची संवेदनशीलता व कार्य तत्परता यांचा अनुभव आला.
   शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांना आनंदाचा सोहळा असला तरी जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या आमदार अशोक पवार यांच्यासाथी कर्तव्य व कार्यतत्परता महत्वाची असल्याचे कृतीतून दिसून आले .यामुळे आपले आनंदाचे क्षण साजरे करताना समाजभान व रुग्णाच्या मदतीची जाण ठेवणारे आमदार पवार यांच्या अनोख्या माणुसकीचे व कर्तव्य तत्परतेने सर्वजण भारावून गेले.
संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!