कोरेगाव भिमा – डिंग्रजवाडी (ता.शिरूर) ढोम वस्ती येथील डी पि. जळाल्याने ऐन उन्हाळ्यात शेती,जनावरे यांना पाणी समस्या उद्भवली होती. ऊस व इतर पिकांना याचा फटका बसणार होता याबाबत शेतकरी दत्तात्रय भाऊसाहेब गव्हाणे व सागर गव्हाणे यांनी आमदार अशोक पवार यांच्याशी संपर्क साधत तातडीने डी पि उपलब्ध करून देण्याची विनंती केली असता आमदार अशोक पवार यांनी तातडीने एम एस सी बी ला सूचना केल्या त्यानुसार तातडीने डी पि उपलब्ध करून देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत आमदार अशोक पवार व एम एस सी बी विभागाचे आभार मानले.
यावेळी हनुमान पतसंस्थेचे संचालक दत्तात्रय भाऊसाहेब गव्हाणे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्ष पुणे जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र पवार सागर गव्हाणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शिरूर तालुका उपाध्यक्ष प्रवीण गव्हाणे, संतोष भोसले, भागिनाथ रिठे ,सोमनाथ जवादे उपस्थित होते.