कोरेगाव भीमा – दिनांक २० एप्रिल
सणसवाडी (ता.शिरूर) येथील सराटी वस्तीवरील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने शेतकरी व नागरिकांचे मोठी प्रमाणात गैरसोय झाली होती.उन्हाच्या झळांनी व उकाड्याने लहान मुले, महिला व नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले .
सराटी येथील स्थानिकांनी ट्रान्स्फर जळाल्याबाबतची तक्रार माजी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर यांना माहिती दिली असता त्यांनी तातडीने आमदार अशोक पवार यांना सदरची समस्या कळवली असता आमदार अशोक पवार यांनी वीजवितरण महामंडळाने अधिकारी नितीन महाजन साहेब यांना ट्रांसफार्मर दुरुस्त करण्याची सूचना केली.
यावर तातडीने महाजन साहेब कार्यवाही करीत अवघ्या काही तासात ट्रान्सफॉर्म बसवला त्यामुळे शेतकरी व स्थानिक नागरिकांनी आमदार पवार व वीजवितरणचे अधिकारी नितीन महाजन यांचे आभार मानले.