Saturday, July 27, 2024
Homeकृषिआमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नांमुळे शिरूर करांवरील पाणीटंचाईचे संकट टळले

आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नांमुळे शिरूर करांवरील पाणीटंचाईचे संकट टळले

कुकडी कालव्यातून पाणी आल्याने निम्मा बंधारा भरला असून तूर्तास शिरूर करांना मिळाला दीड महिना दिलासा

येडगाव धरणातून नगर जिल्ह्यासाठी कुकडी कालव्याद्वारे सोडलेले पाणी ६१ क्रमांकाच्या वितरिकेद्वारे शिरूर शहर आणि परिसरासाठी सोडल्याने शहराच्या पाणीपुरवठा योजनेतील बंधारा निम्म्याहून अधिक भरला असून, शहरातील संभाव्य पाणीटंचाई दूर झाली असून तूर्तास दीड महिना शिरूर शहर व परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून नागरिकांनी आमदार अशोक पवार यांचे आभार मानले.

शिरूर, ता. २५ : शिरूर शहरासह (shirur) परिसराला पाणीपुरवठा (Water supply)करणाऱ्या घोड नदीवरील बंधारा कोरडा पडल्याने (As the embankment on Ghod River has dried up) शिरूर शहराला पाणी पुरवठ्यासाठी घोड नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा कोरडा पडल्याने नदीपात्रातील डबक्यांत साठलेले पाणी उपसून ते शहराला पुरवावे लागत होते. त्यामुळे गेले दहा-बारा दिवस शहरवासीयांना दूषित, दुर्गंधीयुक्त पाणी मिळत होते. त्यातच तीव्र उन्हामुळे बाष्पीभवन होत असल्याने आणि नदीकिनारचे शेतकरी शेतीसाठी या डबक्यांतून पाण्याचा उपसा करू लागल्याने शहराला जेमतेम चार दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक राहिले होते. As the embankment on Ghod River became dry, the water stored in the riverbed had to be pumped out and supplied to the city. Due to this, the residents of the city were getting contaminated and smelly water for the last ten to twelve days. Due to evaporation due to intense heat and the riverside farmers started pumping water from these puddles for agriculture, there was barely enough water left to last the city for four days.
शहरातील संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून नगर परिषद प्रशासनाने पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार करून कुकडी कालव्यातून सोडलेल्या पाण्यातून शिरूरच्या पाणीपुरवठा योजनेतील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा भरून द्यावा, अशी मागणी केली होती.

 येडगाव धरणातून कुकडी कालव्याद्वारे नगर (Nagar), श्रीगोंदा (Shrigonda), करमाळा(Karamala), कर्जत (karjat), जामखेडसाठी (Jamkhed)पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले असून २५ मे ते २५ जून, अशी या आवर्तनाची मुदत होती. ती संपत असताना हे आवर्तन तीन दिवसांनी वाढविण्याची श्रीगोंदा तालुक्यातील लोकप्रतिनिधींची मागणी मान्य करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे आवर्तन तीन दिवस वाढविण्याचा निर्णय जाहीर करताच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे हे आवर्तन वाढणार की मुदतीत संपणार, याबाबत संभ्रम असतानाच कुकडी कालव्याच्या ६१ नंवरच्या वितरिकेतून शिरूरच्या बंधाऱ्यात शनिवारी रात्रीपासून पाणी सोडले.

राळेगण थेर (ता. पारनेर) ही विरिका असून, तेथून पाणी येण्यास सुरवात झाली आहे. दिवसभरात शिरूरच्या पाणीपुरवठा योजनेतील घोडनदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा निम्म्याहून अधिक भरला असल्याने शिरूरकरांची पाणीटंचाईतून तूर्त मुक्तता झाली आहे. शहराला पाणी मिळाल्याने नागरिकांनी सुस्कारा टाकला असून, पाण्याने भरलेला बंधारा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

कुकडी कालव्याच्या ६१ नंबरच्या वितरिकेद्वारे शिरूर शहराच्या पाणीपुरवठा योजनेतील कोल्हापूर पद्धतीच्या बंधान्यात पाणी येत असून, सद्यःस्थितीत बंधारा निम्म्याहून अधिक भरला आहे. हे पाणी शुद्ध असून, ते शहराला दीड महिना पुरेल. तरीही संभाव्य टंचाईच्या स्थितीत नागरीकांनी पाण्याचा जपून वापर करावा. – ॲड. प्रसाद बोरकर, मुख्याधिकारी, शिरूर नगर परिषद


आमदार पवार यांच्या प्रयत्नांना यश – आमदार अशोक पवार यांनी शहर व परिसरातील पाणीटंचाईची गंभीर दखल घेत पाटबंधारे विभागाच्या अधिकान्यांशी संपर्क साधून शिरूर शहर, शिरूर ग्रामीण व परिसराला तातडीने ६१ नंबरच्या वितरिकेतून पाणी मिळावे, अशी आग्रही मागणी केली. त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. पुणे व नगर जिल्ह्यातील पाण्याच्या वादात आमदार पवार यांनी या भागातील पाणीटंचाईची तीव्रता पाटबंधारे विभागाच्या निदर्शनास आणून दिल्याने आमदार पवार यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!