Saturday, May 25, 2024
Homeइतरआमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा दूध उत्पादक संघात शिरूरच्या तीनही उमेदवारांचा...

आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा दूध उत्पादक संघात शिरूरच्या तीनही उमेदवारांचा दणदणीत विजय

शिरूर तालुक्यातील विजयी उमेदवारांसह माजी सभापती सुजाता पवार

कोरेगाव भीमा – दिनांक २१ मार्च

पुणे – पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज दूध डेअरीच्या पंचवार्षिक निवडणुकीत १६ पैकी १५ जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा संघावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.यामध्ये शिरूर तालुक्यातील तीनही उमेदवारांचा विजय मिळवल्याने आमदार अशोक पवार यांचे कर्तबगार नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले असून या विजयाने शिरूर हवेली तालुक्यातील आमदार पवार हेच खरे किंग मेकर असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंद पाहायला मिळत आहे.

शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे स्वप्निल ढमढेरे , महिला प्रतिनिधी केशरबाई पवार,भटक्या जाती विमुक्त जमाती व विशेष मागास प्रवर्गामध्ये राष्ट्रवादीचे निखिल तांबे, रांजणगांव सांडस यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे.

जिल्हा दूध संघासाठी रविवारी (दि.२०) मतदान झाले आणि सोमवारी (दि. २१) सकाळी कात्रज मुख्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब तावरे यांनी मतमोजणीस सुरुवात केली.

शिरूर तालुक्यातील विजयी उमेदवारांना मिळालेले मतदान –

शिरूर – एकूण मतदान १६८ – राष्ट्रवादीचे स्वप्निल ढमढेरे १३० (विजयी) योगेश देशमुख ३६, अवैध २.

महिला प्रतिनिधी (२ जागा)- केशरबाई पवार -शिरूर ५४८ (विजयी), लता गोपाळे – खेड ४३७ (विजयी), रोहिणी थोरात-दौंड ८५, संध्या फापाळे-जुन्नर २०४

भटक्या जाती विमुक्त जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघ (१ जागा) – राष्ट्रवादीचे निखिल तांबे ( रांजणगांव सांडस-शिरुर) ४५० (विजयी), प्रदीप पिंगट – बेल्हे- जुन्नर २३४, अवैध १८.

आमदार अशोक पवार व माजी सभापती सुजाता पवार यांचा सर्वसामान्य जनतेशी असणारा व्यापक व जिव्हाळ्याचा संबंध त्यांच्या यशाचे गमक असून दर्जेदार विकासाच्या माध्यमातून जन सामान्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी नेहमी कटिबद्ध राहणे, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणे यामुळे सर्वसामान्य जनता आमदार दांपत्यास जोडलेली असल्याने त्यांना राजकीय यश प्राप्त होत आहे.

शिरूर मधील उमेदवारांचा विजय हा सर्वसमावेशक विचारांचा , शरद पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचारांचा, कार्यकर्तृत्वाचा, शेतकऱ्यांचा व सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. आमदार अशोक पवार

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!