Friday, September 13, 2024
Homeताज्या बातम्याआमदार अशोक पवार यांच्या खंदे शिलेदराची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड

आमदार अशोक पवार यांच्या खंदे शिलेदराची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड

पुणे  – मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमामध्ये आमदार अशोक पवार यांचे खंदे समर्थक व कोंढापुरी गावचे माजी सरपंच स्वप्नील गायकवाड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड यांची संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीच्या केंद्रिय कार्याध्यक्ष व संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे,शिरूर हवेली चे कार्यसम्राट आमदार  अशोक पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली.

       मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमामध्ये आमदार अशोक पवार यांचे खंदे समर्थक व कोंढापुरी गावचे माजी सरपंच स्वप्नील गायकवाड यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील व स्वर्गीय अरुण आबा गायकवाड यांच्याही ऋणानुबंधास उजाळा मिळाला असून दस्तुरखुद्द शरद पवार यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध असणाऱ्या सहकारी स्व.अरुण गायकवाड यांच्या मुलाला हे पद मिळाल्याने जुने कार्यकर्ते व ज्येष्ठ मार्गदर्शकांनी आनंद व्यक्त केला आहे.

      यावेळी  माजी उपसभापती व रा.प घो.स.सा.कारखान्याचे संचालक विश्वास  ढमढेरे,  खरेदी विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, निमोणे गावचे सरपंच श्याम काळे, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक संजय काळे, विजय ढमढेरे, विनय गायकवाड,योगेश गायकवाड  व अन्य मान्यवर उपस्थित होते

आगामी काळात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार ,पक्षातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असून ग्रामीण भागात पवार साहेबांच्या विचारांच्या समर्थकांना जोडण्याचे व पक्ष विस्तार करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर करणार आहे. – स्वप्नील गायकवाड ,पुणे जिल्हाध्यक्ष  युवक राष्ट्रवादी काँग्रेस

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!