कोरेगाव भीमा – दिनांक १७ जून सणसवाडी ( ता.शिरूर) येथील सणसवाडी येथील प्रगती नगर येथील नागरिकांना विजेचा प्रश्न मागील अनेक दिवसांपासून भेडसावत होता . सिंगल फेज असल्यामुळे घरगुती कनेक्शन अनेक दिवसापासून कमी होल्टेज येत असे त्यामुळे विद्यार्थी, नागरिक यांना त्रास सहन करावा लागत असे याबाबत सोसायटीचे चेअरमन सुहास दरेकर व तेथील नागरिकांनी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर यांना याबाबत आपली समस्या सोडवण्याची विनंती केली होती.
याबाबत पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य पंडित दरेकर यांनी नागरिकांची व विद्यार्थ्यांची समस्या आमदार पवार यांना कळवली असता त्यांनी महावितरण अधिकारी ऐडके साहेब आणि महाजन साहेब यांना प्रगती नगर येथील थ्री फेज कनेक्शन तातडीने करावे अशी सूचना केली . त्यावर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवसात प्रगती नगरीतील थ्री फेज कनेक्शन तारा बसावल्याने (ओढून दिल्याने) सणसवाडी येथील प्रगती नगर रहिवाशांनी आमदार अशोक पवार व पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर,सोसायटीचे चेअरमन सुहास दरेकर यांचे आभार मानले.