Friday, June 21, 2024
Homeस्थानिक वार्ताआमदार अशोक पवार यांचे सणसवाडी येथे पुष्पवृष्टी करत मोठ्या उत्साहात स्वागत

आमदार अशोक पवार यांचे सणसवाडी येथे पुष्पवृष्टी करत मोठ्या उत्साहात स्वागत

आमदार अशोक पवार यांच्या गाण्यावर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर) येथील मयूर नगर आयोजित दुर्गामाता नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिमय व उत्साहाच्या वातावरणात सजारा करण्यात आला.यावेळी आमदार अशोक पवार यांचे पुष्पवृष्टी करत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. स्वागत प्रसंगी फटाकड्यांची अभूतपूर्व आतषबाजी करण्यात आल्याने नागरिकांना नवरात्रोत्सवात दिवाळीची आतषबाजी पाहायला मिळाली.
यावेळी उत्सवात पुन्हा एकदा सणसवाडी ग्रामस्थ व आमदार अशोक पवार यांचे प्रेम व हितगुज यांची चर्चा पाहायला मिळाली. सणसवाडी आणि आमदार अशोक पवार यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे व प्रेमाचे संबंध असून याचा पुन्हा एकदा नवरात्रोत्सवात प्रत्यय आला.
आमदार अशोक पवार दुर्गामातेच्या आरतीसाठी व नागरिकांशी हितगुज साधण्यासाठी येणार असल्याने त्यांच्या स्वागताची सणसवाडी ग्रामस्थांनी जय्यत तयारी करत त्यांचे पुष्प वृष्टिमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. या अनपेक्षित स्वागताने आमदार अशोक पवार भारावून गेले. यावेळी मंडळाच्या वतीने आमदार अशोक पवार यांचा सत्कार करण्यात आला.


आमदार अशोक पवार यांच्या हस्ते दुर्गा मातेची आरती झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात कलाकारांनी सुमधुर गीते सादर केली. यावेळी एका कलाकाराने “राष्ट्रवादी हा पक्ष सदा कर्तव्य दक्ष नाही कुणाच्या धाकात, आमदार अशोक बापू आमदार लाखात” असे गाणे म्हणताच उपस्थित जनसमुदायाने त्यास टाळ्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात प्रतिसाद दिला. आमदार अशोक पवार यांच्या विकास कामामुळे व दूरदृष्टीमुळे सामन्यातील सामान्य नागरिकांच्या मनात त्यांनी आपला एका वेगळा ठसा उमटवला असून त्याचाच हा प्रतिसाद असल्याचे दिसले. यामुळे खुद्द आमदार अशोक पवार हेही नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आनंदीत झाल्याचे पाहायला मिळाले.या उत्सवात महिला भगिनिंसह अबाल वृद्धांनी अभूतपूर्व उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


यावेळी आमदार अशोक पवार यांचा सत्कार करण्यात आला. फेटा ,शाल , श्रीफळ,स्मृती चिन्ह व मंडळाच्या वाटचालीचा अहवाल यावेळी भेट देण्यात आला.या प्रसंगी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर,संचालक राजेंद्र नरवडे,पुणे जिल्हा मनसे उपाध्यक्ष रामदास दरेकर सणसवाडी गावच्या सरपंच संगीता नवनाथ हरगुडे, माजी सरपंच सुनंदा दरेकर, माजी सरपंच स्नेहल भुजबळ,उपसरपंच दत्तात्रय हरगुडे , माजी उपसरपंच विजयराज दरेकर ,माजी पंचायत समिती सदस्या सविता दरेकर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, राहुल हर गुडे ललिता दरेकर सुनिता दरेकर,माजी सरपंच नवनाथ दरेकर , माजी चेअरमन सुहास दरेकर,पुणे जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष गोरक्ष भुजबळ , ग्रामपंचायतचे माजी सदस्य रामदास दरेकर , मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण दरेकर, संचालक निलेश दरेकर , सुभाष दरेकर ,विठ्ठल दरेकर उपाध्यक्ष अशोक करडे व अन्य मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार अशोक पवार यांच्यावर निरपेक्ष प्रेम करणारे गाव असून  आमदार नसताना त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करणे , अनेक छोटे मोठे सुख दुखाचे क्षण वाटून घेतलेले व आपल्या प्रत्येक कार्यक्रमात आमदार अशोक पवार यांना सहभागी करून घेणारे गाव म्हणजे सणसवाडी आहे . येथिल नागरिक आमदार अशोक पवार यांच्यावर त्यांच्या कामामुळे व सामाजिक उत्तरदायित्व जपत विकासाला चालना देणारे आमदार म्हणून अनेक नागरिक पक्षाविरहित प्रेम करत असल्याचे वेगळेपण पाहायला मिळते. आमदार अशोक पवार यांचे हॉस्पिटल बिल, कोरोना काळातील काम,विविध विकास कामे ,नुकताच पार पडलेला रोजगार मेळावा यासारख्या विधायक कामामुळे त्यांच्यावर  प्रेम करणारे अनेक नागरिक जोडले गेले असून त्यांच्याशी विकासकामांची व माणुसकीची  नाळ जुळली आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!