Friday, June 21, 2024
Homeसाहित्य/सामाजिकचला व्यक्त होऊ या?आमदार अशोक पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते पंडित दरेकर एक आगळं वेगळं व्यक्तिमत्त्व

आमदार अशोक पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते पंडित दरेकर एक आगळं वेगळं व्यक्तिमत्त्व

सणसवाडी ( ता.शिरूर) येथील माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य व आमदार अशोक पवार यांचे निष्ठावान समर्थक आणि कार्यकर्ते असणारे पंडित दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांनी भेट देत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील विविध स्तरातील लोकांनी भेट देत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांचे अभिष्टचिंतन केले.

आमदार अशोक पवार यांचे खंदे समर्थक –
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP)विचारधारा मानणारे व माजी केंद्रीय कृषी मंत्री व पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) व माजी उपमुख्यमंत्री ,विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांना मानणारे व शिरूर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार (MLA Adv Ashok pawar) यांचे खंदे समर्थक तालुक्याला परिचित असणारे पंडित दरेकर यांनी विविध निवडणुकांत आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत विजयश्री मिळवत आमदार पवार यांच्या पाठीशी भक्कम उभे राहत आपली निष्ठा जपली आहे.

माणुसकीचे नाते जपणारे मनमिळाऊ नेतृत्व पंडित दरेकर –
माजी पुणे जिल्हा नियोजन समिती पंडित दरेकर यांनी ग्रामीण भागात आपल्या नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून विविध विकास पूर्ण करत एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे.नागरिकांना मोठ्या प्रमाणात रस्ता, सांडपाणी, नरेश्र्वर मंदिर परिसरात विकास निधी देत अनेक विकास कामे करत पद हे मिरवण्यासाठी नव्हे तर जन सेवेसाठी असते हे कृतियुकत उदाहरण आमदार पवार व सुजाता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखवून दिले.
सणसवाडी गावासह इतर ठिकाणी वीज खांब, डी पी दुरुस्ती, दवाखान्यासाठी लागणारी मदत , रोजगार ,शाळेसाठी मदत , नवरात्री उत्सव , महिलांसाठी विविध कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, गणपती उत्सव यांचे भव्य आयोजनात त्यांचा मोलाचा सहभाग असतो.

  आमदार अशोक पवार यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे पंडित दरेकर यांनी आमदार अशोक पवार व सुजाता पवार यांच्या विचारांची एकनिष्ठता जपत जनतेच्या हितासाठी  विकास कामांना महत्व देतात. त्यामुळे पक्ष कोणताही असो पंडित दरेकर यांचे हितसंबंध मैत्रीपूर्ण व घनिष्ठ आहेत. 

विकास कामे व माणसांची मने जपणारे नेतृत्व म्हणजे आमदार अशोक पवार आहेत. सुजाता पवार या शिरूर हवेलीतील नागरिकांवर कुटुंबियांसारखे माया ,प्रेम,जिव्हाळा जपतात. कोरोना काळातील काम असो की परग्रस्तांसाठी मदत अशा विविध समाजोपयोगी कामांमध्ये आमदार दांपत्यासह प्राणपणाने व एकनिष्ठतेने काम करत आपले कर्तव्य पार पाडणारे पंडित दरेकर हे निष्ठावान कार्यकर्ते आहेत.
माणुसकी व मानवता धर्म हा राजकारणापेक्षा मोठा आहे.राजकारण चार दिवसांचे असते पण माणुसकी व मानवता धर्म आयुष्यभरासाठी असतो हे कृतीतून आमदार पवार यांच्या कुटुंबियांकडून शिकलो आहे असे प्रांजळपणे पंडित दरेकर मान्य करतात

निवडणुकीतील विजय आमदार पवार यांचा पण विजयाची पताका व गुलालाचा धुरळा करणारा कार्यकर्ता –

निवडणूक कोणतीही असो आमदार पवार यांनी एकदा पंडित दरेकर यांच्यावर काम सोपवले की ते प्राणपणाने पूर्ण करतात. आमदार अशोक पवार यांच्या विजयाची पताका फडकावत गुलालाचा धुरळा करत जल्लोष साजरा करणारे निष्ठावान कार्यकर्ता म्हणजे पंडित दरेकर. याकामी पक्षाचे नेते,पदाधिकारी , कार्यकर्ते , पै पाहुणे, नातेवाईक, नागरिक व पक्षाची विचारधारा मानणारे, विकासकामांना महत्वपूर्ण स्थान देणारे व कुटुंबासारखे प्रेम करणारे मतदार बंधू भगीनिंचे मोलाचे योगदान असते त्यामुळे हा विजय त्यांचाच असतो आपण फक्त आमदार अशोक बापू पवार यांचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आनंद व्यक्त करायचा असं मत पंडित दरेकर मत मांडतात यावरून विजयाचे श्रेय सर्वांना असून त्याचे शिल्पकार व केंद्रस्थानी आमदार अशोक पवार व माजी सभापती सुजाता पवार आहेत. त्यांच्या विजयात आपला विजय, त्यांच्या आनंदात आमचा आनंद आहे असा मानणारा दिलदार मनाचा ,एकनिष्ठ व कर्तव्यनिष्ठ कार्यकर्ता म्हणजे पंडित दरेकर
आमदार अशोक पवार व सणसवाडी गावाचे एक भावनिक ऋणानुबंध जपणारे नाते असून ते दृढ व घट्ट करण्यात पंडित दरेकर यांचा मोलाचा वाटा आहे.


शब्दांकन – सुहास दरेकर, प्रा. अनिल गोटे

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!