मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नागरीकिकरणामुळे पायाभूत सेवा सुविधांवर येणारा तान गावांची वाढती लोकसंख्येची घनता यामुळे भविष्याच्या दृष्टीने योग्य निर्णय असणार आहे.
कोरेगाव भीमा – दिनांक २० मेसणसवाडी ( ता.शिरूर) आमदार अशोक पवार यांचा विकास कामांचा धडाका प्रभावशाली व गतिमान असून हाती घेऊ ते तडीस नेऊ या भूमिकेतून सदैव विकासकामांच्या ऍक्शन मोड मध्ये असलेल्या आमदार पवार यांनी शिरूर – हवेली तालुक्यात नागरिकांच्या वाढत्या लोकसंख्येच्या घनतेमुळे शिरूर – हवेली मतदार संघात लोणी काळभोर येथे नगरपरिषद तर शिरूरमधील शिक्रापूर, सणसवाडी व हवेलीतील उरुळी – कांचन , कदमवाकवस्ती या ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रुपांतर करण्याची मागणी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे नुकतीच केली आहे . या पाचही गावांच्या प्रस्तावांचा पाठपुरावा आमदार अशोक पवार करणार असून लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने या पाचही गावांची विकास व नागरिकांना मूलभूत सोयसुविधा पोचवण्यासाठी पाच ग्रामपंचायतींचे नगरपंचायत आणि नगर परिषदेत रुपांतरीत करण्याची हालचाली आमदार पवार यांनी सुरू केली आहे . आगामी काळात या गावांमध्ये नगरपरिषद व नगरपंचायत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून वाढत्या नागरीकरणासाठी याबाबत मोठा फायदा होणार आहे.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील लोकसंख्या ३० हजार ३०५ च्याही पलिकडे गेल्याने या गावासाठी नगरपरिषद व्हावी तर शिक्रापूर ( लोकसंख्या २० हजार २६३ ) , सणसवाडी ( लोकसंख्या १३ हजार ५४३ ) तर हवेलीतील कदमवाकवस्ती ( लोकसंख्या १ ९ हजार ३२ ९ ) व लोणी – काळभोर ( लोकसंख्या २२ हजार ३१८ ) या चार गावांसाठी नगरपरिषद व्हावी या मागणीचा प्रस्ताव नगरविकास विभागाचे प्रधान सचिवांकडे आमदार अशोक पवार यांनी दिला आहे . या प्रस्तावाचा पाठपुरावा आमदार पवार स्वत : करणार आहेत . त्यामुळे शिरुर – हवेलीत लवकरच नगर परिषद व नगरपंचायतींची घोषणा होईल , असा आशावाद दरेकर यांनी व्यक्त केला .
वाढते औद्योगीकरण, रोजगार , मोठ्या प्रमाणात होणारे नागरिकिकरण त्यामुळे पूरक व्यवसायांची वाढ यामुळे मोठ्या प्रमाणावर नगरिकिकरण व लोकसंख्या शिरूर व हवेली तालुक्यात वाढताना दिसत आहे याचा परिणाम सेवा सुविधा व विकासावर हित आहे .शिरूर तालुक्यातील शिक्रापूर व सणसवाडी लोकवस्ती वाढत असल्याने लोकसंख्येची घनता वाढत आहे.या गावांमध्ये ग्रामपंचायतींना विकास करताना मर्यादा पडत आहेत. विकासकामे करताना समस्या येत असून या पार्श्वभूमिवर शिरुर – हवेली या दोन्ही तालुक्यातील व मतदार संघातील शिक्रापूर , सणसवाडी ( ता . शिरुर ) व उरुळी कांचन , कदमवाकवस्ती तसेच लोणी – काळभोर ( ता.हवेली ) या पाच गावांतील ग्रामपंचायतीचा दर्जा नगरपंचायत व नगर परिषदेत वर्ग करण्यासाठी आमदार अशोक पवार यांनी पाऊल उचलले आहे .