कोरेगाव. भीमा – दिनांक १६ जून
आमदार अशोक पवार यांच्या कार्यपद्धतीमुळे शिरूर – हवेली येथील नागरिक समाधानी असल्याचे दिसत असून याचा नुकताच प्रत्यय सणसवाडी येथील नागरिकांना आला असून सणसवाडी ( ता.शिरूर) येथील पाटील मळ्यातील ट्रान्सफॉर्मर जळाला होता. तो तातडीने बसविण्यात आल्याने आमदार अशोक पवार व पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर यांचे नागरिकांनी आभार मानले.
सणसवाडी येथील पाटील मळ्यातील ट्रान्सफॉर्मर जळाला होता .या ट्रान्सफॉर्मर वर शेती व घरगुती वापर असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठी अडचण होत होती याबाबत नागरिकांनी याबाबत पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर यांना आपली समस्या सांगितली असता त्यांनी आमदार अशोक पवार यांना कळवले असता. आमदार पवार यांनी नागरिकांच्या य अडचणीची तातडीने दखल घेत महावितरणचे एडके साहेब व एम एस ई बी वरिष्ठ अधिकारी महाजन साहेब यांच्याशी संपर्क समस्या सोडवण्यासाठी सांगितले असता कार्यतत्पर महाजन साहेब व एडके साहेब यांनी चोवीस तासाच्या आत मध्ये ट्रान्सफर देण्यात आला अत्यंत कमी वेळात शेतकऱ्यांना ट्रांसफार्मर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार व पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित आप्पा दरेकर यांचे आभार मानले.