Saturday, November 2, 2024
Homeताज्या बातम्याआदर्श सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते शिक्रापूर येथे आयुष्यामान भारत कार्डचे वाटप

आदर्श सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते शिक्रापूर येथे आयुष्यामान भारत कार्डचे वाटप

जखाते वस्ती सांडभोर नगर, बजरंगवाडी येथील ११८० नागरिकांना कार्डचे वाटप

कोरेगाव भीमा – शिक्रापूर (ता.शिरूर) येथील आदर्श सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते जखाते वस्ती सांडभोर नगर, बजरंगवाडी येथील ११८० नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. ( Ayushyaman Bharat Card)


यावेळी आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी केंद्र शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचायला हव्यात ,त्याचा त्यांना लाभ व्हायला हवा तसेच आयुष्यमान भारत म्हणजे आभा कार्ड प्रत्येक नागरिकाने काढायला हवे.यामुळे त्यांना विविध वैद्यकीय सुविधा मिळतील आणि गरजेच्या वेळी आरोग्याची सर्व माहिती मिळाल्याने योग्य तो उपचार डॉक्टरांना करणे सोपे जाईल यासाठी कार्ड आवश्यक असून आशा सेविका कल्पना धोकले यांच्या कामाची स्तुती करत त्यांनी ही योजना यशस्वी होण्यासाठी महत्वपूर्ण काम केले.

प्रत्येक दिवसाला चाळीस नागरिकांची नोंदणी त्यानंतर दहा दिवसांनी त्यांची पुन्हा तपासणी करण्यासाठी काम करावे लागले त्यानंतर पि व्ही सी कार्ड तयार करण्यात येऊन नागरिकांना त्याचे वाटप करण्यात आले.यासाठी सर्व परिश्रम आशा वर्कर कल्पना ढोकले यांनी महत्वपूर्ण योगदान दिले.(Ayushyaman Bharat Card)
यावेळी आदर्श सरपंच रमेश गडदे,ग्राम पंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, कृष्णा सासवडे, आशा वर्कर कल्पना ढोकले, नागरिक ,महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!