Friday, June 21, 2024
Homeताज्या बातम्याआई वडिलांच्या नर्मदा परिक्रमा पूर्णता सोहळ्यानिमित्त सणसवाडी येथे भव्यदिव्य दैदिप्यमान भागवत कथेचे...

आई वडिलांच्या नर्मदा परिक्रमा पूर्णता सोहळ्यानिमित्त सणसवाडी येथे भव्यदिव्य दैदिप्यमान भागवत कथेचे अभूतपूर्व आयोजन

ह.भ प. विनेकरी सुरेश लाला दरेकर व शकुंतला सुरेश दरेकर यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी ३६०० किलोमीटरचा खडतर प्रवास करत १२० दिवसांमध्ये नर्मदा परिक्रमा पूर्ण केली

कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर) येथील विणेकरी ह.भ.प. सुरेश लाला दरेकर (वय७५ वर्ष) यांनी पत्नी शकुंतला सुरेश दरेकर ( वय ७२वर्ष,) यांच्या सोबत वयाच्या ७५ व्या वर्षी ३६०० किलोमीटरचा खडतर पायी प्रवास १२० दिवसांमध्ये पूर्ण केल्यामुळे आई वडिलांच्या इच्छेला व आनंदाला प्राधान्य देत गावात अभूतपूर्व नेत्रदीपक दैदिप्यमान अशा भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते.
या भागवत कथेच्या निमित्त यजमान सुरेश लाला दरेकर व शकुंतला सुरेश दरेकर यांच्या आनंदासाठी नवनाथ सुरेख दरेकर,गोरक्ष सुरेश दरेकर व नारायण सुरेश दरेकर यांनी साधला हस्ते दान धर्म करत , दररोज सात ते आठ हजार लोकांच्या महाप्रसादाचे आयोजन केले होते.यावेळी गावातील अन्नदात्यांनी पुण्यकर्मात आपला सहभाग नोंदवला.
या सोहळ्यासाठी देहू संस्थानचे नवनिर्वाचित अध्यक्ष मोरे महाराज यांच्यासह खंडेलवाल, काटे महाराज यांनी उपस्थिती लावली होती.

यावेळी २३ मार्चला नारदव्यास संवाद / शुकंदेव आगमन ,
२४ मार्चला कपिल देवहुति संवाद / दक्ष, ध्रुव, पृथकथा,
२५ मार्चला कपिल देवहुती संवाद / दक्ष ध्रुव पृथकथा – धान्यतुला जडभरत, प्रल्हाद कथा / वामन अवतार – वस्त्रदान,

२६ मार्चला ,श्रीराम जन्म / श्रीकृष्ण जन्म नंदोत्सव – रजतदान / गोदान,
२७ मार्चला श्रीकृष्ण बाल लिला / गोवर्धन पुजा – भूदान,

२८ मार्चला कंस उद्धार,उद्धव चरित्र ,रुक्मिणी विवाह , मुख्यमंत्री / रुक्मिणी विवाह – सुवर्णदान
२९ मार्चला सुदाम चरित्र शुकदेवची विदाई – श्री भागवत पुजन चारधाम पुजन – द्रव्यदान
३० मार्चला रामनवमी साजरी करण्यात आली.

यावेळी नवनाथ,गोरक्ष व नारायण यांनी भागवत सोहळ्याप्रसंगी आईवडिलांची ग्रंथतूला, धाण्यतुला, वस्त्रतुला, रजततुला, गोदान , भूदान ( तीन गुंठे जागा दान ), सुवर्ण दान, द्राव्यादाना मध्ये सणसवाडी येथील श्री खंडोबा मंदिरास रंग देण्यासाठी, ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर व नरेश्वर महाराजांच्या चांदीच्या पालखीसाठी व सणसवाडी प्रासादिक दिंडीच्या आळंदी येथील धर्म शाळेसाठी सढळ व मुक्त हस्ते भरीव देणगी दिली.या कार्यक्रम प्रसंगी आपल्या आई वडिलांसह वयाचा अमृतमहोत्सवी वर्षात (७५ वर्षांच्या) १०१ दाम्पत्यांना उभा पोशाख व सन्मान चिन्ह देऊन मोठा कौतुक व गौरव सोहळा करण्यात आला.
यावेळी गावातील गरीब कुटुंबांना वस्त्रदान, अन्नदान यामध्ये डाळी, तेल,कडधान्य यांच्यासह जीवनावश्यक वस्तूंचे भरगच्च कित देण्यात आले.यामुळे गरीब कुटुंबाच्या चेहऱ्यावर वेगळाच समाधानाचा आनंद पाहायला मिळाला.
याचबरोबर या भागवत कथेसाठी भव्यदिव्य असे तीन मजली स्टेज व नेत्रदीपक रोषणाई, स्टेजच्या सर्वात वर पाच भगवे झेंडे, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छञपती शिवाजी महाराजांचा सिहांसनावरील विलोभनीय पुतळा, त्याखाली उजव्याबजुला संत ज्ञानेश्वर महाराज , मधोमध श्री विठ्ठल रुक्मिणी माता, डावीकडे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची छोटी व सुंदर मंदिरे, समोर भागवताचार्य संतोषनंदजी शास्त्री त्यांच्या उजव्या बाजूला यजमान सुरेश लाला दरेकर ,शकुंतला सुरेश दरेकर व वाद्यवृंद व साऊंड सिस्टीम यांच्यासह महिला व पुरुष यांच्यासाठी भव्य बैठक व्यवस्था आणि भव्य स्क्रीन असा नेत्रदीपक सोहळा आयोजित करण्यात आला होता.
भागवत कथेच्या वेळी सणसवाडी पंचक्रोशीतील महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत होते यावेळी उपस्थित सहा ते सात हजार भाविकांना दररोज भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.या धार्मिक कार्यक्रमात अन्नदात्यांनी अन्नदान केले तर गावातील जय महाराष्ट्र ,जय मल्हार व श्री राम तरुण मंडळ यांच्यासह गावातील अनेक तरुणांनी उत्स्फूर्तपणे भोजन वाढणे ,कार्यक्रमाची इतर सुव्यवस्था चोख ठेवणे यासाठी मोलाचे काम केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिरूर बाजार समितीचे माजी संचालक दत्तात्रय पठाण हरगुडे, काँग्रेसचे वैभव यादव, सावता माळी परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ, विष्णू हरगुडे, आकाश हरगुडे, सर्पमित्र बाळू मोरे, सनी भुजबळ, मंगल शिवाजी गव्हाणे, गीता भुजबळ, शीतल भुजबळ व सणसवाडी ग्रामस्थ प्रासादिक दिंडी व भजनी मंडळ,अन्नदाते यांनी मोलाचे आयोजन व नियोजन केले.

माजी अध्यक्ष दत्तात्रय पठाणराव हरगुडे यांनी भागवताचार्य संतोषनंदजी शास्त्री यांना इलेक्ट्रिक दुचाकी भेट दिली. माजी अध्यक्ष दत्तात्रय हरगुडे यांचे सणसवाडी येथील धार्मिक ,राजकीय ,सामाजिक कार्यात मोलाचे सहकार्य असते.


कोट्यावधींच्या जमिनीवरून आईवडिलांच्या संपत्ती साठी मुले भांडत असताना वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा जपणाऱ्या या कुटुंबात पंढरीच्या वारीची मोठी परंपरा आहे.सुरेश दरेकर हे विनेकरी आहेत. त्यांच्या मुलांनी त्यांच्या आनंदासाठी भव्यदिव्य सोहळ्याचे यशस्वी आयोजन केल्याने तरुणाईला एक वेगळा व सत्मार्ग मिळाला असून दिखाव्यापेक्षा ज्यांनी आपल्याला जग दाखवले त्यांच्यासाठी आपण वेळ देत त्यांचे ऋणी राहत आपण सेवा करायला हवी असा अनमोल कृतियुक्त संदेश समाजासमोर ठेवला आहे.

आधुनिक श्रावण बाळ म्हणून दरेकर बंधुचा गौरव –
औद्योगिक नगरी सणसवाडी येथील नवनाथ ,नारायण व गोरक्ष यांनी आईवडिलांच्या इच्छेसाठी व आनंदासाठी भव्यदिव्य व दैदिप्यमान अशा अभूतपूर्व भागवत कथेचे आयोजन केले होते. सणसवाडी येथे राजकारण अथवा प्रसिद्धी यापैकी काहीही नको असलेल्या या कुटुंबाने भागवत कथा आयोजित करून पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मने जिंकली असून आपल्या आईवडिलांच्यासह गावातील १०१ दाम्पत्यांना वयाची ७५ पूर्ण केली त्यांना उभा पोशाख देत सर्वांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. या कार्यक्रमामुळे सणसवाडी पंचक्रोशीतील तरुणाई आता आपल्या आईवडिलांच्या इच्छेखातर मोठा भव्यदिव्य सोहळा आयोजित करण्याच्या विचारात आहेत. एका ठिकाणी रामकथेचे आयोजन केले आहे.

फोटो ओळ

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!