Thursday, July 25, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रआईवडीलांची मान खाली झुकू द्यायची नाही म्हणून संघर्ष करा स्पर्धेत स्वतःला सिद्ध...

आईवडीलांची मान खाली झुकू द्यायची नाही म्हणून संघर्ष करा स्पर्धेत स्वतःला सिद्ध करत त्यांच्या कष्टाचे सोने करा.. आभाळ तुमचे आहे- वसंत हंकारे

संस्करादिपो भव कार्यक्रमाच्या माध्यमातून बाराशेच्या मुलांवर संस्कार शिल्प कोरण्यात वसंत हंकारे यांच्या अनमोल मार्गदर्शनाने मुलांच्या जीवनात ज्ञानदीप प्रज्वलित

कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील सरपंच सुवर्णा रामदास दरेकर व उद्योजक रामदास बबनराव दरेकर यांच्या विद्यमानाने सणसवाडी येथील विद्यार्थ्यांना संस्कारदिपोभव या संस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

   यावेळी “असंख्य चुका करत आपण घडत असतो, आपण संकटाला आव्हान देत,  मनातला निश्चय पूर्ण करत आणि आई वडिलांची स्वप्ने पूर्ण करत, गगनात भरारी घेत जेव्हा सोनेरी आयुष्य घडवतो आणि समाजात कुटुंबाची मन उंचावेल अशी कामगिरी करा,एक आदर्श भारतीय नागरिक व्हा, मनातील घुसमट करणाऱ्या चुका एका कागदात लिहून त्या होमामध्ये जाळण्यात आल्या पुन्हा या चुका होणार नाही असा निष करत,आई वडिलांच्या कष्टाचं सोन करण्यासाठी स्वत:च्या आयुष्याला घडवण्यासाठी आपण कष्ट करायला हवेत” असा संदेश देत व्याख्याते वसंत हंकारे यांनी संस्करदिपो भव कार्यक्रमात अनमोल मार्गदर्शन केले.

समाजात आपण जन्माला आलो त्याचे काही देणे लागतो ते देणे संस्काराच्या शिबिराचे आयोजन करत सांस्करित पिढी देण्यासाठी व सर्वांना ज्ञानदानाचे काम करत पुढील पिढीला संस्कार शिल्प घडवण्याचे काम सरपंच सुवर्णा रामदास दरेकर, उद्योजक रामदास बबनराव दरेकर यांनी केले असल्याचे मत माजी संचालक दत्तात्रय हरगुडे यांनी व्यक्त केले.

     कार्यक्रम प्रसंगी राजेंद्र दरेकर,पत्रकार शरद पाबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाबळे , दत्तात्रय हरगुडे यांनी मार्गदर्शन केलं.यावेळी सरपंच सुवर्णा रामदास दरेकर , ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, मोहन हरगुडे, माजी सरपंच संगीता हरगुडे, ग्राम पंचायत सदस्या शशिकला सातपुते, माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, माजी चेअरमन सुहास दरेकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाबळे, शालेय व्यवस्थापन समितीचे गणेश दरेकर, अक्षय हरगुडे, संतोष नरके, संभाजी दरेकर, विकास दरेकर, माजी सरपंच रमेश सातपुते, उद्योजक रामदास दरेकर,विकास दरेकर, पत्रकार राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद पाबळे, प्रशांत मैड, ज्ञानेश्वर मिडगुले, विठ्ठल वळसे पाटील, शेरखान शेख, उदयकांत ब्राम्हणे, प्रमोद कुतवळ, आकाश भोरडे , शंकर पाबळे मान्यवर उपस्थित.

नवीन पिढी उत्तम संस्काराची, विज्ञानाची कास धरणारी, कृतज्ञ व देशभक्त पिढी घडवण्यासह माणूस व देशभक्त घडवण्यासाठी सदर संस्करदीपो भव कार्यक्रमाचे आयोजन केल्याचा सार्थ अभिमान वाटतो- सरपंच सुवर्णा रामदास दरेकर

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!