Saturday, July 27, 2024
Homeइतरआंतरराज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्काराने पुणे जिल्हा नियोजन समितीचे पंडित दरेकर व...

आंतरराज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्काराने पुणे जिल्हा नियोजन समितीचे पंडित दरेकर व खरेदी-विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे सन्मानित

माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर यांच्या हस्ते आंतरराज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्कार स्वीकारताना पंडित दरेकर व राजेंद्र नरवडे

आम्हाला मिळालेला पुरस्कार हा आमदार अशोक पवार व सुजाता पवार यांच्या कृतिशील विचारांचा सन्मान – राजेंद्र नरवडे व पंडित दरेकर

कोरेगाव भीमा – दिनांक २७ मार्च

चिक्कोडी ( बेळगाव) नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलोपमेंट सोसायटी बेळगाव यांच्यावतीने नुकताच आंतरराज्य पुरस्कार वितरण सोहळा माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.कर्नाटक, महाराष्ट्र ,गोवा या तीन राज्यातून कार्यकर्तृत्व सिद्ध केलेल्या विशेष व्यक्तींना प्रत्येक वर्षी हा पुरस्कार देण्यात येतो . यावर्षी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर व खरेदी विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे यांच्या सामाजिक सेवेची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बेळगाव ( चिक्कोडी) येथील नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फौंडेशनच्या वतीने देण्यात येणारा आंतरराज्य पुरस्कार पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर यांना कोरोना काळातील जनसेवेसाठी व कामगार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तर खरेदी-विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे यांना सहकारी संस्थेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आंतरराज्य पुरस्कार देण्यात आला असून गोवा, कर्नाटक , महाराष्ट्र राज्यातून निवडक पुरस्कारार्थिमध्ये समावेश होण्याचा बहुमान शिरूर तालुक्यातील दोन कर्तबगार सुपुत्रांना मिळाला आहे.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावणुर,बेळगावचे खासदार अमरसिंह पाटील,माजी ब्रिगेडियर इंडियन आर्मी सुधीर सावंत, कोल्हापूर महानरपालिकेचे माजी महापौर राजू शिंगाडे,गुलबर्गा जिल्हा पोलीस अधीक्षक महेश मेगन्नावर,जिल्हा कमांडंट अरविंद घट्टी यांच्या पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडीत दरेकर व खरेदी-विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे यांनी आपल्या सामाजिक व शैक्षणिक निमशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय व अतुलनीय निःस्वार्थी व भरीवपणे कार्य करून शाश्वत सेवा केलेबद्दल वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेच्या सन्मानार्थ विधायक व कौतुकास्पद कार्याची दखल घेऊन आंतरराज्य पुरस्कार वितरण समिती , बेळगाव तर्फे गोवा , कर्नाटक , महाराष्ट्र राज्यातील निवडक व्यक्तिमध्ये निवड करून सामाजिक सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

आमदार अशोक पवार व सुजाता पवार यांच्या कृतिशील विचारांचा सन्मान – आमदार अशोक पवार यांचे खंदे समर्थक व माजी सभापती सुजाता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यात सहभागी होणारे दरेकर व नरवडे यांनी पूर असो की कोरोना काळातील वैद्यकीय मदत , कोव्हिड सेंटर मदत , दवाखान्यातील बिल असो की कोरोना योद्ध्यांचा सन्मान , सामाजिक सेवा क्षेत्रात नेहमीच आमदार अशोक पवार यांची सावली म्हणून बनून राहणाऱ्या निष्ठावंत सहकाऱ्यांचा सन्मान म्हणजे आमदार अशोक पवार व सुजाता पवार यांच्या कृतिशील विचारांचा सन्मान आहे अशी भावना खरेदी विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे यांनी
व्यक्त केले.

तीन राज्यात शिरूर तालुक्याचा नावलौकिक -गोवा, कर्नाटक , महाराष्ट्र राज्यातून निवडक पुरस्कारार्थिमध्ये समावेश होण्याचा शिरूरच्या सुपुत्रांचा बहुमान मिळाला असून या सन्मानाने शिरूर तालुक्याच्या शिरपेचात आंतरराज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्काराचा मन तुरा खोवला गेला असून आमदार अशोक पवार म्हणजे समाजकारण व सेवाभावीवृत्ती जोपासणारे विनयशील नेतृत्व असून इतरांना फुले वाटणाऱ्या हातांना सुगंध मात्र नक्कीच मिळतो याचा प्रत्यय जिवाभावाचे मित्र व आमदार पवारांचे खंदे समर्थक दरेकर व नरवडे यांना आला आहे.

आंतरराज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्कार हा आमदार अशोक पवार व सुजाता पवार यांच्या समाजसेवेच्या कृतियुक्त विचारांचा सन्मान, सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांचा आशीर्वाद असून या पुरस्काराने समाजसेवेची जबाबदारी वाढली आहे.यापुढेही समाजसेवेचे व्रत कायम जपणार असून आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम केल्याने सन्मान मिळाला आहे ही वैचारिक व सामाजिक बांधिलकी कायम जपणार आहे. – पंडित दरेकर, सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती

आंतरराज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्कार हा आमदार अशोक पवार व सुजाता पवार यांच्या समाजसेवेच्या कृतियुक्त विचारांचा सन्मान, सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांचा आशीर्वाद असून या पुरस्काराने समाजसेवेची जबाबदारी वाढली आहे.यापुढेही समाजसेवेचे व्रत कायम जपणार असून आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम केल्याने सन्मान मिळाला आहे ही वैचारिक व सामाजिक बांधिलकी कायम जपणार आहे.
-पंडित दरेकर, सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!