Saturday, July 27, 2024
Homeसाहित्य/सामाजिकसंस्कृतीअहिल्यामाई पराक्रमी, लोककल्याणकारी लोकमाता होत्या : सतीश काळे

अहिल्यामाई पराक्रमी, लोककल्याणकारी लोकमाता होत्या : सतीश काळे

– संभाजी ब्रिगेडच्या वतीने अहिल्यामाई होळकर यांना अभिवादन

पुणे – स्त्री हिंमतवान,कर्तृत्ववान, बुद्धिमान,पराक्रमी,मुत्सद्दी, करारी,शूर,उत्तम राज्यकर्ती असते हे कृतीतून अहिल्यामाई होळकर यांनी जगाला दाखवून दिले. अहिल्यामाई होळकर यांचे कार्य केवळ एका राज्यापुरते,जातीपुरते, देशापुरते मर्यादित नाही. तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आहे. त्या पराक्रमी,लोककल्याणकारी लोकमाता होत्या, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केले.संभाजी ब्रिगेडच्या वतीने अहिल्यामाई होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

सतीश काळे यांच्या हस्ते मोरवाडी, पिंपरी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, उपाध्यक्ष गणेश बावणे, संघटक सिध्दार्थ भोसले, महेश पाटील, योगेश जाधव आदी या वेळी उपस्थित होते.

सतीश काळे म्हणाले की, राज्यातील उत्पन्न कौटुंबिक हितासाठी नव्हे, तर प्रजेच्या कल्याणासाठी वापरणाऱ्या अहिल्यामाई या महान लोककल्याणकारी लोकमाता होत्या. त्यांच्या राज्यात भ्रष्टाचाराला थारा नव्हता. भ्रष्टाचार करणाऱ्याचा त्यांनी बंदोबस्त केला होता. प्रशासनावर त्यांचा वचक होता. अहिल्यामाईंनी आपल्या राज्यात आमूलाग्र बदल केला. प्रवाशांना लुटणाऱ्या दरोडेखोरांचा बंदोबस्त केला. त्यांना पडीक जमिनी देऊन त्यांच्या हाताला काम दिले. लुटारूंना संरक्षण खात्यात घेऊन प्रवाशांच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. प्रवाशावर नाममात्र संरक्षण कर लावला व त्यातून त्यांच्या पगाराची व्यवस्था केली. गुन्हेगारांना मारण्यापेक्षा त्यांना उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करून.

दिले.अहिल्यामाई स्वतः युद्धकलेत निपुण होत्या. त्यांनी आपले राज्य टिकविले आणि वाढविले,असे प्रतिपादन सतीश काळे यांनी केले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!