हडपसर परिसरातील संतापजनक घटना
पुणे – हडपसर परिसरातून एक संतापजनक हडपसर परिसरातील संतापजनक घटनाघटना उघडकीस आली. एका अल्पवयीन कॉलेज तरुणीवर दोन तरुणांनी सामूहिक अत्याचार केला. मांजरी परिसरातील नदीपात्रात हा प्रकार घडला.याप्रकरणी पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अनुराग साळवे आणि गणेश म्हेत्रे असे अत्याचार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी तरुण हे पीडित तरुणीचे मित्र होते. वाढदिवसाचा केक कापण्याचा बहाणा करून आरोपींनी दुचाकीवरून तरुणीला मांजरी येथील निर्जनस्थळी नेलं. पिडीत अल्पवयीन मुलीवर मांजरीतील निर्जन स्थळी लैंगिक अत्याचार केला व तिला तिथेच सोडून दिले.
रात्री परिसरात कुणी नसल्याची संधी साधत आरोपींनी पीडितेवर सामूहिक अत्याचार केला. अत्याचारानंतर आरोपींनी पीडितेला नदीपात्रातच सोडून दिलं. याबाबत कुणालाही सांगितल्यास तुला जीवे मारू, अशी धमकी देखील पीडितेला दिली. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.