Thursday, October 10, 2024
Homeताज्या बातम्याअल्पवयीन दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू. पाबळ येथील घटना.

अल्पवयीन दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू. पाबळ येथील घटना.

 पाबळ (ता. शिरूर)  येथे शेततळ्यात बुडून मृत्यू दोन अल्पवयीन सख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने मोठ्या प्रमाणात शोक व्यक्त करण्यात येत असून आर्यन संतोष नवले वय १३ व आयुष संतोष नवले  वय १० (रा. राहू ता. दौंड) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत.

या बाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी मृत आर्यन व आयुष हे दोघे कालच दि.२१ मे रोजी मामा सचिन भाऊसाहेब जाधव यांच्याकड़े पाबळ येथे शाळेला सुट्टी लागल्याने आले होते. बुधवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास हे दोघे घरा शेजारी असलेल्या भाऊसाहेब बापू जाधव यांच्या शेततळ्या जवळ खेळत खेळत गेले.दोघानी  कपडे काढून शेततळ्यात उडी मारली. परंतु पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही शेततळ्यात बुडाले. शेजारीच शेळ्या चारत असलेल्या त्यांचे आजोबा बाळासाहेब जाधव यांनी घटना पाहील्यावर मदती साठी आवाज दिला.कैलास आण्णाजी जाधव यांनी दोघांना पाण्या बाहेर काढले. परंतु दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच या दोघाही भावांचा मृत्यू झाला होता.पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!