कराड हेमंत पाटील
कराड – इंजिनिअर्स असोसिएशनच्या माध्यमातून अभियंता दिनानिमित्त देण्यात येणारा १५ वा ‘सर विश्वेश्वरय्या’ पुरस्कार श्री शिवाजी सोसायटीमधील वरीष्ठ स्थापत्य अभियंता इंजिनीयर अरूण आबासाहेब जानुगडे यांना जाहीर झालेबद्दल त्यांची भेट घेऊन “श्री शरद तांदळे लिखित आंत्रप्रेन्युअर” पुस्तक, शाल, श्रीफळ देऊन अभिनंदन व सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेवक सौरभ अशोकराव पाटील, रविंद्र मुंढेकर , जयंत बेडेकर,सतीश भोंगाळे, मंगेश वास्के, भारत थोरवडे, शोहेब सुतार, अजय सूर्यवंशी,भारत जाधव व इतर.
अरूण जानुगडे यांचे आणि आदरणीय पी. डी.पाटील यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते.त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत स्थापत्य अभियांत्रिकी ही पदवी मिळविली. रयत शिक्षण संस्थेसारख्या नावाजलेल्या संस्थेच्या अनेक इमारती उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. स्वतः बांधकाम व्यवसाय सांभाळत जानुगडे यांनी सामाजिक क्षेत्रातही भरीव काम केलेले असल्याने त्यांना जाहीर झालेला ‘सर विश्वेश्वरय्या’ पुरस्कार त्यांच्या आजवरच्या कामाची पोचपावती आहे.