कराड मधील मनसे सैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण तर रॅलीला कॉलेज मधील तरुणाईची अलोट गर्दी
कराड – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र व युवानेते अमित ठाकरे हे सध्या पश्चिम महारष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांचे कराड शहर मनसे सैनिकांच्या वतीने जल्लोषात व उत्साहाच्या वातावरणात स्वागत करण्यात आले.यावेळी त्यांच्या रॅलीला तरुणाईने मोठा प्रतिसाद दिला असून युवानेते अमित ठाकरे यांच्या स्वागतासाठी मोठा पुष्पहार बनवण्यात आला होता तसेच स्वागत कमान,फलक लावण्यात येऊन त्यांचे सवाद्य स्वागत करण्यात आले.
प्रथमतः अमित ठाकरे यांनी छत्रपति शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून रॅलीला सुरुवात केली. ही रॅली कराड पेठेतून जाताना त्यांना पाहण्यासाठी अनेक दुकानदार नागरिक यांनी प्रचंड गर्दी केली होती.अमित ठाकरे यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकास अभिवादन करून कमानी मारुती मंदिर येथे नारळ फोडला. या उत्साहाच्या वातावरणात उपस्थितांनी जय बजरंग बली की जय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा …, अमित ठाकरे तुम आगे बढो या घोषणा देण्यात आल्या.
अमित ठाकरे यांची रॅली पाहण्यासाठी कॉलेज मधील विद्यार्थि आणि विद्यार्थिनी यांनी गर्दी केली होती.यावेळी अमित ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या फलकाचे अनावरण केले. कार्यकर्त्यांनी अमित ठाकरे यांच्या स्वागतासाठी मोठा पुष्पहार बनवला होता तो पुष्पहार क्रेनच्या साह्याने अमित ठाकरे यांना घालण्यात आला.
या रॅलीचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा प्रमुख विकास पवार , धैर्यशील पाटील, कराड शहर प्रमुख सागर बर्गे, स्वयंरोजगार सेनेचे नितीन महाडिक ,विद्यार्थि सेनेचे शहर प्रमुख विनायक भोसले केले होते तर कराड शहर ट्रॅफिक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उत्तम नियाजन केले होते.