Thursday, July 25, 2024
Homeइतरअभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकशाहीचा आत्मा आहे - प्र-कुलगुरू डॉ शाम शिरसाठ

अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकशाहीचा आत्मा आहे – प्र-कुलगुरू डॉ शाम शिरसाठ

पंडित नेहरू महाविद्यालयाच्या राष्ट्रीय परिषदेची सांगता.

राष्ट्रीय परिषदेस मार्गदर्शन करताना प्र कुलगुरू डॉ शाम शिरसाठ

औरंगाबाद – दिनांक २६ एप्रिल
औरंगाबाद – अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा आत्मा असल्यामुळे आपल्या देशातील प्रत्येक नागरिक हा आपल्या राजकीय नेतृत्वाच्या यशापयश बद्दल आपले मत मांडू शकतो. भारतीय लोकशाहीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत चीनच्या नागरिकांना कुतूहल आहे.असे मत डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ शाम शिरसाठ यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषद आणि पंडित जवाहरलाल नेहरु महाविद्यालय औरंगाबाद, संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव, व कै. बाबुरावजी काळे महाविद्यालय अजिंठा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेच्या मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी बोलत होते.

यावेळी अजिंठा शिक्षण संस्थेचे सचिव श्री प्रकाश काळे हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.पुढे बोलतांना डॉ शिरसाठ यांनी येणाऱ्या काळात आपल्याला शैक्षणिक विकास साध्य करायचा असेल, तर आपणांस बहुविद्याशाखीय अभ्यास करावा लागणार आहे. भारतीय लोकशाहीमध्ये देशाला दिशा देणाऱ्या वैचारिक समितीत आता हळुहळु शिक्षण क्षेत्रातील लोकांचासुद्धा समावेश होत आहे. म्हणून विविध विषयांच्या भरणा-या परिषदांमधून देशाला दिशा देण्यासाठी विचारमंथन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत अमृतकर यांनी परिषदेच्या माध्यमातून जागतिक, राष्ट्रीय व राज्यस्तरीय घडामोडींवर होणाऱ्या चर्चा पूरक ठरतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी मंचावर माजी प्राचार्य डाॅ. पी. डी. देवरे, महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रमोद पवार, सचिव प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भणगे, अजिंठा शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. अशोक नाईकवाडे, परिषदेचे संयोजक व प्रभारी प्राचार्य डॉ. पंडित नलावडे, प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, प्राचार्य डॉ. मीना पाटील, उपप्राचार्य डॉ एस आर मंझा, उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे, डॉ एल यु मेश्राम, डॉ राजू वनारसे, प्रा श्रीकृष्ण परिहार यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रशांत देशमुख व डॉ. रमेश औताडे यांनी केले. तर आभार प्रभारी प्राचार्य डॉ. पंडित नलावडे यांनी मानले.
दोन दिवस चाललेल्या या राष्ट्रीय परिषदेत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. चर्चासत्रातील पहिल्या सत्रामध्ये भारत आणि बदलते जग या विषयावर डॉ. विठ्ठल दहिफळे, नांदेड यांनी साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले. सत्राध्यक्ष म्हणून डॉ. लियाकत खान, मुंबई यांनी काम पाहिले. दुसऱ्या सत्रात डॉ. मोयीन शाकिर, डॉ.भा. ल. भोळे आणि डॉ. यशवंत सुमंत स्मृती व्याख्यानमालेत आंतराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, मुंबई यांनी मार्गदर्शन केले. सत्राध्यक्षपदी डॉ. सुजा शाकीर औरंगाबाद होते. तिसऱ्या सत्रात भारतीय लोकशाहीची अमृतमहोत्सवी वाटचाल या विषयावर प्राचार्य डॉ. अशोक नाईकवाडे औरंगाबाद आणि डॉ. संभाजी पाटील धुळे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. नवनाथ आघाव हे सत्राध्यक्ष होते. चौथ्या सत्रात महाराष्ट्र राज्याच्या सहा दशकांची वाटचाल या विषयावर डॉ. दत्तात्रय वाबळे, पुणे यांनी मार्गदर्शन केले. डॉ विलास आवारी हे सत्राध्यक्ष होते.
या चर्चासत्रात महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले १८० प्राध्यापक व संशोधक यांनी सहभाग घेतला. यावेळी नवोदित प्राध्यापक आणि संशोधक यांनी आपल्या शोध निबंधांचे वाचन केले. ही परिषद यशस्वी करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरु महाविद्यालय औरंगाबाद, संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव व कै. बाबुरावजी काळे महाविद्यालय अजिंठाचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

अध्यक्षपदावरून बोलताना अजिंठा शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश काळे यांनी पर्यावरण, लोकशाहीतील दबावतंत्र आणि नेत्यांचा अभ्यासातील अभाव याविषयी चिंता व्यक्त करून, लोकशाही बळकट करण्यासाठी या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेसाठी ५१ हजारांचा धनादेशही परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या सुपूर्द केला.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!