Friday, May 24, 2024
Homeशिक्षणअन्नछत्र परिषद कमिटीच्या संचालक पदी स्मिता गायकवाड याची नियुक्ती

अन्नछत्र परिषद कमिटीच्या संचालक पदी स्मिता गायकवाड याची नियुक्ती

हवेली प्रतिनिधी – सुनील थोरात

हवेली- हडपसर ( ता.हवेली) आपल्याकार्यातून आपली ओळख निर्माण होत असते . न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. याची प्रचिती स्मिता गायकवाड यांच्या कार्यातून दिसते.

युवा नेते अभिजीत बोराटे यांनी हिंदवी स्वराज्य संस्थे मार्फत चालविण्यात येत असलेल्या अन्नछत्र परिषद कमिटीच्या संचालक पदी स्मिता गायकवाड यांची निवड करत त्यांच्या कार्याची दखल घेतली.

"माझ्यावर विश्वास दाखवून, आत्तापर्यंत केलेल्या कार्याची नोंद घेत मला नियुक्ती पत्र दिले त्या बद्दल मी मनापासून आभार मानते पदाबरोबरच समाजाच्या बांधिलकीची जबाबदारी वाढली असून तळागाळातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार"

स्मिता गायकवाड , नवनिर्वाचित संचालक अन्नछत्र परिषद कमिटी

नियुक्ती प्रमाणपत्र उद्योजक राहुल तुपे, नगरसेवक मारुती तुपे, अभिजीत बोराटे, जीवन जाधव, संजय हरपळे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी तुषार गायकवाड, अमित भाऊ गायकवाड, संदीप राऊत, महेश ससाणे, गणेश बोराटे, मोहिनी शिंदे ,अन्नछत्र परिषदेचे प्रवीण टिळेकर, व्यंकटेश भंडारी, सुधीर गांगट उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!