Saturday, July 27, 2024
Homeसाहित्य/सामाजिकसंस्कृतीसंतांनी देव , धर्म या पलीकडे जाऊन समाजामध्ये वैचारिक मंथन घडवून...

संतांनी देव , धर्म या पलीकडे जाऊन समाजामध्ये वैचारिक मंथन घडवून समाजाला सुजाण करण्याचे व समाजप्रबोधनाचे महत्त्वपूर्ण काम केले – प्रा.उल्हास पाटील

तुकाराम महाराजांच्या जयंती निमित्त कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. उल्हास पाटील उपस्थित मान्यवर

कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर)

येथील दत्त मंदिरात गाथा परिवारातर्फे आयोजित संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या कार्यक्रम प्रसंगी प्रा.उल्हास पाटील यांनी महाराष्ट्र ही संतांची भूमी असून , अनेक संतांनी देव , धर्म या पलीकडे जाऊन समाज प्रबोधनाचे काम केले , समाजामध्ये वैचारिक मंथन घडवून आणले असून समाजाला सुजाण करण्याचे महत्वपूर्ण कार्य संतांनी केले .आपण संतांची मूळ शिकवण विसरलो आहोत . भक्तीनंतर मुक्ती आहे . वर्ण , जात , धर्म , पंथ भेद विसरून सर्वांना समतेच्या प्रवाहात आणण्याचे काम संतांनी केले आहे . त्यांनी माणसात देव शोधला आहे .असल्याचे मत गाथा परिवाराचे संस्थापक प्रा . उल्हास पाटील यांनी व्यक्त केले .
यावेळी तुकाराम महाराजांनी समाजाला वैचारिक अधिष्ठान व दिशा देण्याचे महान कार्य केले असून महाराष्ट्राच्या वैचारिक जडण घडणीत त्यांचा मोठा सहभाग असल्याचे मत व्यक्त करण्यात आले .
अध्यक्षस्थानी माजी सरपंच आबासाहेब गव्हाणे होते .यावेळी शिरूर हवेली प्रासादिक दिंडीचे कार्याध्यक्ष हनुमंत शिवले , अध्यक्ष भाऊसाहेब गव्हाणे , पांडुरंग थोरात , गणपत काळकुटे , शिवव्याख्याते व कीर्तनकार गणेश महाराज फरताळे , भरत भोसुरे , रमेश गव्हाणे , सूर्यकांत शिवले , हरिभाऊ गायकवाड , बबनराव गव्हाणे , अशोक घावटे , अर्जुन गव्हाणे,निवृत्ती वाळके आदी उपस्थित होते .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र कंद यांनी , स्वागत प्रकाश गोसावी यांनी तर प्रास्ताविक सीताराम बाजारे यांनी केले .

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!