Saturday, June 22, 2024
Homeइतरअनेक वर्षांपासून प्रलंबित वीजतारा समस्या आमदार अशोक पवार यांनी सोडवल्याने सणसवाडीतील...

अनेक वर्षांपासून प्रलंबित वीजतारा समस्या आमदार अशोक पवार यांनी सोडवल्याने सणसवाडीतील नागरिक समाधानी

एरियल बंच केबल कामाबाबत स्थानिकांशी व्हिडिओ कॉल वर चौकशी करताना आमदार अशोक पवार व त्याबाबत आपल्या भावना व्यक्त करताना ग्रामस्थ

आमदारांच्या कार्यतत्परतेमुळे नागरिकांचे वाचवले पाच लाख रुपये

कोरेगाव भीमा : सणसवाडी ( ता . शिरूर )

आनंदनगर येथील नागरिकांच्या जीवावर बेतत असलेल्या तारा हटवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पैसे गोळा करत असल्याचे समजताच आमदार अशोक पवार यांनी तत्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांना तारा बदलून तेथे एरियल बंच केबल टाकण्याच्या सूचना केल्या , त्यामुळे महावितरणने तत्काळ त्यांच्या निधीतून तारा बदलून घेतल्या व नागरिकांचे पैसे वाचले . सणसवाडी ( ता . शिरूर ) येथील मधील लोकवस्तीत आनंदनगर ठिकठिकाणी धोकादायक विद्युत तारा असल्याने अनेक ग्रामस्थांना आपल्या कुटुंबासह जीव मुठीत धरून वास्तव्य करण्याची वेळ आली होती .

नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या विजतारा प्रश्नाबाबत नागरिकांनी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर , सरपंच स्नेहल भुजबळ व माजी सरपंच सुनंदा दरेकर यांना विनंती केली असता त्यांनी तात्काळ याबाबत आमदार अशोक पवार यांच्याशी संपर्क साधत आपली समस्या सांगितली . याबाबत तातडीने कार्यवाही करण्यासाठी व नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी संबधित विभागाचे येडके साहेबांना तातडीने सूचना केली. सणसवाडीतील नागरिकांच्या वीज तक्रारी व गरज लक्षात घेता वीज वितरण महामंडळाचे अधिकारी महाजन साहेब यांनी स्वतः भेट देत तातडीने सर्व वीज तारा भूमिंतर्गत करण्याचा व नागरिकांच्या मागणीनुसार इतर वीज काम दुरुस्ती बाबत काम सुरू केल्याने नागरिकांसह ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच व सदस्य यांना अत्यंत आनंद झाला असून याबाबत सर्वांनी आमदार अशोक पवार यांच्या तातडीच्या कार्यतत्परतेबाबत समाधान व्यक्त केले.

या प्रश्नाबाबत माजी सरपंच सुनंदा दरेकर व ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र दरेकर यांनी खूप प्रयत्न केले होते याबाबत सतत सर्वांच्या संपर्कात राहून काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले होते यामुळे नागरिकांनी आमदार पवार, नियोजन समितीचे पंडित दरेकर माजी सरपंच सुनंदा दरेकर ,सदस्य राजेंद्र दरेकर,महाजन साहेब यांचे विषेश आभार व्यक्त केले.

आमदार अशोक पवार यांनी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर,सरपंच स्नेहल भुजबळ,माजी सरपंच सुनंदा दरेकर , उपसरपंच सागर दरेकर यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संपर्क साधत कामाबाबत विचारणा केली यावर सर्वांनी समाधान व्यक्त करत आमदार अशोक पवार यांचे अत्यंत आभार मानले व एम एस सी बी चे अधिकारी महाजन साहेब यांच्याशी आमदार पवार यांनी कामाबाबत विचारणा करत सूचना पालन करण्याचे सांगत मैत्रीपूर्ण संवाद साधला यामुळे सणसवाडी ग्रामस्थांनी आनंद व समधान व्यक्त केले.

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर,सरपंच सुनंदा दरेकर,उपसरपंच सागर दरेकर,ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र दरेकर , , दत्तात्रय हरगुडे, अक्षय कानडे,शशिकला सातपुते, संगीता हरगुडे,सुवर्णा दरेकर,रुपाली दरेकर,ललिता दरेकर, महाजन साहेब, उद्योजक नवनाथ दरेकर,रामदास नाना दरेकर , दगडू दरेकर,नवनाथ हरगुडे, माजी ग्राम पंचायत सदस्य रामदास दरेकर, कुंदा हरगुडे, ग्राम सेवक बळणाठ पावणे, सुभाष दरेकर ,प्राध्यापक अनिल गोटे मान्यवर उपस्थित होते.

आमदारांच्या कार्यतत्परतेमुळे नागरिकांचे वाचवले पाच लाख रुपये

रुपयेतीन लाखांची लोकवर्गणी वाचली या धोकादायक विद्युत तारांचा प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असताना यासाठी लागणारा खर्च समस्त नागरिक वर्गणी काढून जमा करत असून ३ लाख ६० हजार जमा केले असल्याची माहिती आमदार अशोक पवार यांना मिळताच त्यांनी ही बाब मनावर घेत या ठिकाणी तातडीने महावितरणला तारा बदलून तेथे एरियल बंच केबल टाकण्याच्या सूचना केल्या असता महावितरणचे येडके व महाजन यांनी सदर ठिकाणी भेट देत येथील धोकादायक विद्युत तारा काढून त्याजागी ५ लाखाचे एरियल बंच केबल बसवून दिले . त्यामुळे नागरिकांमध्ये आमदार अशोक पवार यांच्या कार्याविषयी समाधान दिसत आहे.

सणसवाडी येथे एरियल बंच केबल काम करणाऱ्या महाजन साहेब यांचा सत्कार करताना पंडित दरेकर व उपस्थित मान्यवर
संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!