Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्याअजित पवार यांना पक्ष व चिन्ह मिळाल्याबद्दल शिक्रापूर येथे फटाकड्यांची आतषबाजी व...

अजित पवार यांना पक्ष व चिन्ह मिळाल्याबद्दल शिक्रापूर येथे फटाकड्यांची आतषबाजी व घोषणांनी दणाणून सोडला परिसर

कोरेगाव भीमा – शिक्रापूर (ता.शिरूर) निवडणूक निर्वाचन आयोगाने आपला निकाल जाहीर केला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह व पक्ष अजित पवार यांना देण्यात आल्याचा जाहीर होताच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात येत आहे यामध्ये शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील अजित  पवार राष्ट्रवादी काँग्रेस या कार्यकर्त्यांनी फटाकड्यांची आतषबाजी करत एकच वादा …. अजित दादा.. अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.यामध्ये तरुणाईचा सहभाग विशेष लक्षणीय होता.

  निवडणूक निर्वाचन आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यावर आपला निकाल जाहीर केला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांना दिल्याने ठिकठिकाणी आनंद व्यक्त करण्यात येत असून त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शिक्रापूर येथील कार्यकर्त्यांनी निकाल कळताच समाज माध्यमांवर स्टेटस ठेवत अजित पवारांना समर्थन व्यक्त केले तर उत्साही कार्यकर्त्यांनी शिक्रापूर चौकात येऊन फटाकड्यांच्या आतषबाजी केली तर एकच वादा अजित दादा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडत आपला आनंद व्यक्त केला यावेळी तरुणाईचा उत्साह व आनंद कौतुकास्पद होता.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!