Wednesday, September 11, 2024
Homeसाहित्य/सामाजिकअखेर सोमवार दिनांक २९ ऑगस्ट पासुन हवेली तालुक्यातील ११ गुंठे शेतजमीनीचे सामुहिक...

अखेर सोमवार दिनांक २९ ऑगस्ट पासुन हवेली तालुक्यातील ११ गुंठे शेतजमीनीचे सामुहिक खरेदीदस्त सुरू होणार – संदिप भोंडवे

शेतकरी व बहुजन वर्गाच्या गुंठेवारी करणाऱ्या भूमिपुत्रांना न्याय मिळवून देत सर्वसामान्य कुटुंबाचे घराचे स्वप्नपूर्ण होण्यासाठी प्रयत्न – संचालक प्रदीप कंद

सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आमरण उपोषणाला बसत अवघ्या एका दिवसातच आदेश काढण्यास शासनाला पाडले भाग

भाजपा हवेली तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे यांच्या प्रयत्नांना यश

हवेली तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंब व प्लॉटिंग व्यावसायिकांनी प्रदीप कंद व संदीप भोंडवे यांच्या कामाचे कौतुक करत केला अभिनंदनाचा वर्षाव

कोरेगाव भीमा – दिनांक २५ ऑगस्ट

नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिर्देशक श्रावण हार्डीकर यांनी राज्यात ११ गुंठे पर्यंत खरेदी खते नोंदणीसाठी परिपत्रक काढुन नोंदणी न करण्याचे आदेश काढले होते . या निर्णयाला याचिकेतून औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले होते . या आदेशाल औरंगाबाद खंडपीठाने रद्द ठरवून पुन्हा ११ गुंठे पर्यंत खरेदी ख नोंदविण्यास राज्य सरकारला आदेश दिले होते . त्यांनंतर राज्यात ११ गुंठे पर्यंत नोंदणी सुरू होती . मात्र हवेली तालुक्यात विभागाने नोंदणी करण्यासाठी प्रतिबंध कायम ठेवला होता .


केवळ हवेली तालुक्यावर हा अन्याय असल्याने भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष संदिप भोंडवे यांनी नोंदणी व मुद्रांक महानिर्देशक श्रावण हार्डीकर यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला होता . मात्र दखल न घेतली गेल्याने भाजपच्या वतीने विभागी कार्यालयासमोर गुरुवार ( दि . २५ ) पासून संदिप भोंडवे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते . मात्र पहिल्याच दिवशी नोंदणी व मुद्रांक विभागाचे पुणे निबंधक अनिल पारखे यांनी पत्र काढून भोंडवे यांना नमुद प्रमाणभूत क्षेत्र बागायत जमिनीकरिता ११ गुंठे व जिरायत जमिनींसाठी २० गुंठे वरील शेतजमिनींचे दस्त नोंदणीबाबत दस्तातील खरेदीदाराकडुन शेतकरी असल्याबाबतचा पुरावा घेऊन दस्त नोंदणी करण्याचे आदेश/ पत्र दिल्याने भाजप नेते व जिल्हा बँकेच संचालक प्रदिप कंद यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडण्यात आले.
मागील अनेक महीन्यापासून हवेली तालुक्यातील ११ गुंठे शेतजमीनीचे सामुहिक खरेदीदस्त नोंदणी बंद करण्यात आली होती त्यामुळे सर्वसामान्य नागरिक , शेतकरी व छोटे मोठे प्लाॅटींग चा व्यवसाय करणारे उद्योजक हे प्रचंड त्रासले होते . या सर्वांच्या अडचणी लक्षात घेऊन तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन न होता ११गुंठे शेतजमीनीचे सामुहिक खरेदीदस्त सुरु करावेत अन्यथा २५ ऑगस्ट पासुन बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येईल तसेच कशा प्रकारे खरेदीदस्त नोंदविता येतील असे पत्र भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे यांच्या वतीने नोंदणी महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य प्रमुख श्रवण हर्डीकर यांना देण्यात आले होते.
त्यानुसार गुरुवार २५ऑगस्टला ११ वाजता बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात झाली व दुपारी १ वाजता आंदोलन कर्त्यांचे बाजुने प्रदीप कंद , धर्मेंद्र खांडरे , प्रविण काळभोर , राहुल शेवाळे, तानाजी गावडे , कमलेश काळभोर , व इतर प्रमुख नेते श्रवण हर्डीकर यांच्यासोबत चर्चा करण्यास गेले व प्रदीर्घ चर्चेनंतर सोमवार दिनांक २९ ऑगस्ट पासुन ११ गुंठे अथवा त्यापेक्षा जास्त शेतजमिनीची सामुहिक खरेदीदस्त सुरु करण्याचे मान्य केले. याबाबत सह जिल्हा निबंधक अनिल पारखे यांनी संबधित आदेश हवेली तालुका भाजपा अध्यक्ष संदीप भोंडवे यांना दिले व बेमुदत आमरण उपोषण सोडण्याची विनंती केली . संबंधित अधिकाऱ्यांचे पत्र मिळाल्याने उपोषण सोडण्यात आले.

२९ ऑगस्ट पासुन ११ गुंठे अथवा त्यापेक्षा जास्त शेतजमिनीची सामुहिक खरेदीदस्त सुरु करण्याचे मान्य केल्याने येथील शेतकरी व बहुजन वर्गाच्या भूमिपुत्र सर्वसामान्य कुटुंबातील व्यावसायिक व खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबांना न्याय मिळणार आहे.यामध्ये प्लॉटिंग व्यावसायिक व सर्वसामान्य खरेदीदार यांचे  समान हित साधण्यासाठी व योग्य त्या उपाययोजना राबवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
      संचालक प्रदीप कंद, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 
संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!