Saturday, May 25, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रअखेर कोरेगाव भिमा ग्रामस्थांच्या समोर टोरेंटो गॅस कंपनीने सादर केले लेखी हमीपत्र

अखेर कोरेगाव भिमा ग्रामस्थांच्या समोर टोरेंटो गॅस कंपनीने सादर केले लेखी हमीपत्र

कोणत्याही वास्तुला धोका झाल्यास गॅस कंपनी जबाबदार – मिलिंद नरहरशेट्टिवार

सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्ट्रक्चर ऑडिट करून लेखी हमीपत्र आणखी बाकी 

कोरेगाव भीमा – कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील भीमा नदीवरील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पुलास गॅस कंपनीच्या पाईप लाईन खोदकामामुळे कोणताही धोका निर्माण होणार नाही झाल्यास सदर टोरेंटो गॅस कंपनी पुणे लिमिटेड जबाबदार राहील असे लेखी हमीपत्र कोरेगाव भिमाचे सरपंच विक्रम गव्हाणे व ग्रामस्थांच्याकडे सुपूर्त करण्यात आले असले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्ट्रक्चर ऑडिट करून लेखी हमीपत्र मिळाले नाही.याबाबत ग्राम पंचायतीच्या वतीने पत्रव्यवहार का करण्यात आला नाही याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

 कोरेगाव भीमाचे माजी सरपंच विजय गव्हाणे व माजी सरपंच व ग्राम पंचायत सदस्य संदीप ढेरंगे यांनी सदर खाजगी गॅस कंपनीच्या पाईप लाईनमुळे कोरेगाव भीमा येथील १०० वर्षे जुना  ऐतिहासिक ठेवा असलेल्या पुलास कोणताही  धोका नसल्याबाबत बांधकाम विभागाचे व संबधित अधिकारी यांचेस्ट्रक्चर ऑडिट करून लेखी हमीपत्र तसेच टोरेंटो या खाजगी गॅस कंपनीचे हमीपत्र देण्यात येऊन काम सुरू करण्यात यावे अशी मागणी करत सरपंच विक्रम गव्हाणे व ग्राम सेवक रतन दवणे यांच्या उपस्थितीत सदर खोदकाम थांबवण्यात आले होते.

     याबाबत सदर टोरेंटो गॅस कंपनीने  कोणत्याही स्थापत्यास गॅस पाईप लाईन मुळे धोका होणार नसल्याचे लेखी हमीपत्र कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीला दिले असून सर्व सुरक्षा विषयक अटिशर्ती पाळूण काम करण्यात येणार आहे .भविष्यात कोणत्याही स्थापत्याला धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी टोरेंट गॅस कंपनीची असल्याचे गॅस कंपनीचे एजीएम कल्पेश पोतदार यांनी सांगितले असून याबाबत लेखी हमीपत्र व्हॉईस प्रेसिडेंट मिलिंद नरहरशेट्टिवार यांनी  दिले आहे

अटीशर्ती पालन करत असल्याने  गॅस लाई्नच्या खोदकामास  ग्रामपंचायतीने मंजुरी दिली असल्याचे सरपंच विक्रम गव्हाणे यांनी सांगितले असले तरी या अटी शर्तीचे काटेकोरपणे पालन सदर कंपनी करत असल्याबाबत पाहणी कोण करते ? व त्यावर नियंत्रण कोणाचे आहे ? यासाठी शासनाकडून त्यातील तज्ञ अधिकारी म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

ग्राम सेवक रतन दवणे यांच्या कामाबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त करत ग्रामसेवक गैरसमज निर्माण करतात त्यामुळे गावात वादविवाद होत असल्याचे मत व्यक्त केले. दवणे यांच्या कारभाराविषयी ग्रामस्थांमध्ये नाराजी पहावयास मिळत आहे.

यावेळी कोरेगाव भिमाचे सरपंच विक्रम गव्हाणे, माजी उपसरपंच दत्तात्रय ढेरंगे, उपसरपंच गणेश कांबळे, ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे, शांताराम फडतरे, ग्रामसेवक रतन दवणे व कंपनीचे एजीएम कल्पेश पोतदार, रुपेश कुमार सिंग आदी उपस्थित होते. 

कोरेगाव भीमा ग्राम पंचायतीच्या वतीने बांधकाम विभागास ऐतिहासिक पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करून लेखी हमीपत्र बाबत कोणताही पत्र व्यवहार न करण्याचे कारण तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे काम थांबवायचे आणि दुसरीकडे संबधित विभागाशी पत्रव्यवहार करायचा नाही हा दुटप्पीपणा का करण्यात येत आहे.ग्रामसेवक रतन दवणे यांनी कंपनीला नाहरकत दाखला प्रत दिली होती तर काम बंद करताना संबधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी का दाखवली नाही.मग ग्राम पंचायत मधून देण्यात आलेल्या नाहरकत दाखला हा कोणाकडे आहे असा प्रश्न निर्माण होत असून याबाबत पारदर्शक कारभार होईल का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

लक्ष दोन वर्षांपूर्वीच्या रस्त्यावर तर ऐतिहासिक पुल वाऱ्यावर – दोन वर्षांपूर्वीच्या बनवण्यात आलेल्या  रस्त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून रक्कम जमा करून घेण्यात आली आहे पण १०० वर्षे जुन्या ऐतिहासिक पुलाच्या बाबतीत रक्कम ठेवली नसल्याची बाब उघडकीस आली आहे. सदर टोरेंटो गॅस कंपनीने पाईप लाईनचे काम करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ता व इतर मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी व तसे झाल्यास त्यांच्याकडून दुरुस्ती करण्यात यावी यासाठी काही रक्कम बांधकाम विभागाकडे ठेवली आहे.पण पुलाच्या बाबतीत अशी कोणतीही रक्कम ठेवण्यात आली नसल्याची माहिती उपअभियंता राहुल कदम यांनी दिली आहे.

 

 सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ग्राम पंचायत कोरेगाव भीमा यांचा कोणताही अर्ज आला नसून संबधित पुलाच्या बाबतीत स्ट्रक्चर ऑडिट करून लेखी हमीपत्र मागितल्यास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात येईल .  – उपअभियंता राहुल कदम सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!