कोरेगाव भीमा – शिक्रापूर ( ता.शिरूर) येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हा मासिक बैठक १७ फेब्रुवारी ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्र शिक्रापूर येथे पार पडली सदर बैठकीला पुणे जिल्ह्यातील १३तालुक्यातील अध्यक्ष ,संघटक ,सचिव व ५९ कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हा सचिव पदी संतोष प्रकाश शिर्के, निमगाव म्हाळुंगी यांची निवड झाली तर पुणे जिल्हा प्रवासी विषय समिती प्रमुखपदी नितीन मिंडे, दौंड तालुका महिला अध्यक्षपदी लता कुंभार ,महिला सहसंघटक पदी अश्विनी पंडित , शिरूर तालुका सचिव संदेश कळमकर यांची निवड झाली.
सदर बैठकीला मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष धनंजय गायकवाड, पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप निंबाळकर, पुणे जिल्हा संघटनमंत्री भानुदास सरडे , महसूल समिती प्रमुख मध्य महाराष्ट्र प्रांत रमेश टाकळकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर, पुणे जिल्हा आरोग्य समिती प्रमुख संपत नाना फराटे, पुणे जिल्हा उर्जा समिती प्रमुख राहुल दिघे, पुणे जिल्हा सहसंघटक तुकाराम फराटे, कार्यकारीणी सदष्य दिलीप बेद्रे ,शिरूर तालुका अध्यक्ष व ग्राहक संरक्षण परिषद सदस्य देवेंद्र जगताप यांच्या सह, पुणे जिल्ह्यातून ५९ कार्यकर्ते हजर होते. निवडी नंतर शासकीय कार्यालयाशी समन्वय साधून शेतकरी ग्राहकाशी निगडीत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संतोष शिर्के यांनी सांगितले.