Saturday, July 27, 2024
Homeराजकारणअक्षय मोहिते यांची शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदी निवड

अक्षय मोहिते यांची शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदी निवड

कराड हेमंत पाटील

कराड – कराडचे माजी दिवंगत जिल्हाप्रमुख कै. संजय मोहिते यांचे पुत्र अक्षय मोहिते यांची उपजिल्हा प्रमुख पदी निवड झाली आहे.याबाबत निवडीचे पत्र आमदार मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहे.अक्षय मोहिते हे शिवसेना शिंदे गटाचे कट्टर व एकनिष्ठ समर्थक असून त्यांची निवड झाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे .आगामी काळातील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा मोठा प्रभाव जाणवणार आहे.

जिल्ह्यातील तरुणाई व ज्येष्ठ नागरिकांशी घनिष्ठ संबंध असलेल्या अक्षय मोहिते यांच्या निवडीने समाजातील सर्व घटकांशी जोडण्याचे महत्वपूर्ण कार्य होणार असून जिल्हाभर याचा प्रभाव दिसणार आहे. अक्षय मोहिते यांच्यासारखा पदाधिकारी मिळाल्यामुळे शिवसेना शिंदे गटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवून त्यांचे आयुष्य सुखकर करण्यासाठी प्रयत्न करणार असून कराड शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना जोडण्याचे काम करणार आहे. – उपजिल्हाप्रमुख अक्षय मोहिते

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!