Wednesday, November 20, 2024
Homeक्राइमस्फोटकाचा वापर करत ए. टी. एम. मशीनचा स्फोट घडवून पैशांची लुट करण्याचा...

स्फोटकाचा वापर करत ए. टी. एम. मशीनचा स्फोट घडवून पैशांची लुट करण्याचा प्रयत्न केलेल्या टोळीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ए. टी. एम.मशीनचा स्फोट करण्याचा चोरट्यांनी केला तीन वेळा प्रयत्न

पुणे – यवत (ता.दौंड)  पारगाव हे गाव केडगाव चौफुला ते शिरूर महामार्गावरील मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. आजुबाजूचे पंचक्रोशी साठी मोठी बाजारपेठ असल्याने नागरीकांचे व्यवहार सुलभ होणेसाठी बऱ्याच कंपन्यांचे, बँकांचे ए.टी.एम. मशीन पारगाव गावात आहेत. पारगाव गावातील इंडीया वन कंपनीचे ए.टी.एम. असून नागरीकांचे सोयीसाठी चोवीस तास चालु असते. या गोष्टीचा गैर फायदा घेत काही चोरट्यांनी त्या ए.टी.एम. मशीनची टेहळणी करून मे २०२३ मध्ये स्फोटकांचा वापर करून ए.टी.एम. मशीन चा स्फोट करून चोरी करण्याचा प्रथमतः प्रयत्न केला. परंतु त्यांना स्फोटकांचा स्फोट घडविता आला नाही व चोरटे पळून गेले. (Pune Crime News)

ए.टी.एम. चोरीचे गुन्हयाचे गांर्भीय लक्षात घेवून वरिष्ठांच्या आदेश व मार्गदर्शनानुसार गुन्हयाचा तपास चालू असताना दि. ०६/०७/२०२३ रोजी व दि. २६/०७/२०२३ रोजी असा दोन वेळा पारगाव गावातील त्याच इंडीया वन ए.टी.एम. मशीनचा स्फोटकाद्वारे स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न चोरटयांनी केला. त्याबाबत यवत पोलीस स्टेशनला वेगवेगळे दोन गुन्हे नोंदविणेत आले होते. चोरटयांचे तीनही प्रयत्न अयशस्वी झाले होते. परंतु स्फोटकाद्वारे स्फोट घडवून चोरीचा प्रकार गंभीर असल्याने गुन्हे उघडकीस आणणे पोलीसांसाठी आव्हान होते.(Crime News)

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सी. सी. टी. व्ही. फुटेज तपासले असता चोरी करणेसाठी आलेले चोरटे हे न्हावरा बाजुकडून येवून पुन्हा न्हावरा बाजूकडे जात असल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने गोपनीय बातमीदाराकडून मिळालेली बातमी तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपी नामे १) विशाल छबु पल्हारे, (वय २० वर्षे) रा. हांगेवाडी, ता श्रीगोंदा जि अहमदनगर २) आदित्य प्रदीप रोकडे (वय २० वर्षे) रा. चिंचणी ता शिरूर जि पुणे, ३) अनिकेत संजय शिंदे (वय २०) वर्षे रा. बोरी ता श्रीगोंदा जि अहमदनगर यांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.( Pune Rural police)

सदरची कामगिरी  पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल साो, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग आनंद भोईटे, स्थानिक गुन्हे शाखेचे  पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स.पो.नि. राहुल गावडे, पो.स.ई. गणेश जगदाळे, पो.हवा. सचिन घाडगे, तुषार पंदारे, राजु मोमीण, अतुल डेरे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, आसिफ शेख, यांनी केली असून पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे व पो.ना. विकास कापरे हे करत आहेत. 

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!