Wednesday, November 20, 2024
Homeक्राइमसोलापूर महामार्गावर पोलिसासमोर पीकअप चालकाला मारहाण

सोलापूर महामार्गावर पोलिसासमोर पीकअप चालकाला मारहाण

वाहन चालकाचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर…. सांगा ना साहेब कायदा पाळू की जीव सांभाळू

प्रतिनिधी नितीन करडे

खामगाव फाटा,यवत (ता.दौंड) येथे पुणे बाजूने सोलापूरकडे भरधाव वेगात जाणाऱ्या पीकअप वाहनाने दुभाजकासह स्ट्रीट लाईट खांबाला जोरदार धडक दिल्याने खांब खाली पडला तो सोलापूर कडून पुणे बाजूस येणाऱ्या स्विफ्ट डीझायर गाडीवर पडल्याने गाडीचे नुकसान झाले तसेच त्यामागून येणाऱ्या दुचाकी चालकाला जखमी केल्याने उपस्थित संतप्त जमावाने पिकअप चालकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत पीक अप गाडीवर दगडफेक करत गाडीचे नुकसान केले विशेष म्हणजे पीक अप चालकाला पोलिसासमोर मारहाण झाल्याने वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Pune – solapur Highway Accident)

पुणे सोलापूर महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असून २२ जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पुणे बाजूने सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या पीकअप (MH २० GC ४८८०) ने दुभाजकासह विजेच्या खांबास जोरदार धडक दिल्याने मोठा आवाज झाला सदर खांब पुण्याकडे येणाऱ्या मारुती कंपनीच्या स्विफ्टवर खांब पडल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून यात चालक मात्र जखमी झाला आहे.त्यामागे येणाऱ्या दुचाकीस्वारावर खांब पडल्याने तोही जखमी झाला. (Highway Accident)

पोलिसासमोर चालकाला जमावाकडून मारहाण व गाडीवर दगडफेक – अपघाताची माहिती मिळताच तातडीने घटना स्थळी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार भोर घटनास्थळी दाखल झाले त्यांनी संबधित चालकाला ताब्यात घेतले पण यावेळी संतप्त जमावाने पोलिसांना न जुमानता चालकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला पोलीस हवालदार भोर संबधित चालकास पोलीस चौकीला घेऊन येताना घटनास्थळीच पुन्हा जमाव आक्रमक झाला व चालकावर हल्ला केला तसेच पीकअप वाहनावर दगडफेक करत गाडीचे नुकसान करत चालकाला बेदम लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. (Pune Gramin police)

चालकाला वाचवताना जमावाकडून पोलिसाला धक्काबुक्कीपीकवाहन चालकाला मारहाण होत असताना त्याला वाचवण्यासाठी पोलीस हवालदार भोर यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना जमावाकडून न कळत धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला असल्याने वाहन चालकाला मारहाण करणाऱ्या जमावावर यवत पोलीस गुन्हा दाखल करणार का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

सांगा ना कायदा पाळू की जीव सांभाळू – नवीन कायद्यानुसार कायदा सांगतो वाहन चालकांनी अपघात स्थळावरून पळून जाऊ नये नवीन कायद्यानुसार हिट अँड रन प्रकरणामध्ये रस्ते अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि वाहनचालकाने तिथून पळ काढला तर चालकाला दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा आणि सात लाख रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो अशी तरतूद असाली तरी वाहन चालकांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत आणखी स्पष्टता यायला हवी.

अपघात झाल्यावर वाहन चालक व उपस्थितांनी जखमींना तातडीने उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत पण संतप्त जमाव बऱ्याचदा वाहन चालकावर हल्ला चढवतो यामुळे जिवाच्या भीतीने वाहन चालक पळून जाण्याचा प्रयत्न करतो मग यावेळी चालकासमोर जीव वाचवायचा की कायदा पाळायचा हा प्रश्न उपस्थित होतो.

हिट अँड रन प्रकरणामुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले असल्याचे सत्य असले तरी पोलिसासमोर वाहन चालकाला मारहाण होत असेल तर वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येतोच अपघातग्रस्त व्यक्तीला जमावाने तातडीने उपचारासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देत जवळच्या नातेवाईकांना संपर्क करत स्थानिक पोलीस स्टेशनशी अथवा महामार्ग अपघात मदत केंद्राशी संपर्क करत सदर वाहन चालकाला पोलिसांच्या स्वाधीन करणे योग्य राहील पण बऱ्याचदा वाहन चालकावर हल्ला होतो.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!