Wednesday, November 20, 2024
Homeताज्या बातम्यासणसवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

सणसवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

सणसवाडी औद्योगिक परिसरातील विविध कंपन्यांमधील ११०० कामगार या शिबीरात सहभागी

कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथे क्रोमवेल इंजिनिअरींग कंपनी आणि शिक्रापूरातील मंगल मेडिकल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ११०० कामगारांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली.सर्व कामगारांना मोफत तपासणी, मोफत उपचार आणि मोफत औषधांचे वाटप या वेळी करण्यात आले.

औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या प्रामुख्याने जाणवणाऱ्या व्याधींच्या अनुषंगाने सर्व तपासण्या करण्यात आल्या असून ११०० कर्मचारी या शिबिरात सहभागी झाल्याची माहिती सरपंच रुपाली दगडू दरेकर व उपसरपंच राजेंद्र दरेकर यांनी दिली.

औद्योगिक क्षेत्रातील कामगार, अभियंते यांना प्रामुख्याने होणाऱ्या व्याधिंबाबत माहिती गेल्या दहा वर्षांपासून शिक्रापूरातील मंगल मेडिकल फाऊंडेशनकडून संकलित करणे सुरू आहे. यात प्राधान्याने श्वसनाचे आजार, रक्ताचे आजार, पोटाच्या व्याधी, मानसिक ताणतणाव व हृदयाशी संबंधित आजारांचे प्रमाण जास्त असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणात आढळला आहे. वरील व्याधींना केंद्रस्थानी ठेवून कामगारांच्या तपासणीची पहिली मोहीम नुकतीच पार पडली. यात शिबिरासाठी क्रोमवेल कंपनीने सहकार्य केल्याने सणसवाडी औद्योगिक परिसरातील विविध कंपन्यांमधील ११०० कामगार या शिबीरात सहभागी झाले. या तपासणीमध्ये काही मोजक्या कामगारांना गंभीर आजाराचे निदान झाल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.या सर्व कामगारांना मोफत तपासणी, मोफत उपचार आणि मोफत औषधांचे वाटप या वेळी करण्यात आले. अशी शिबिरे आता औद्योगिक क्षेत्रात नियमित सुरू करणार असल्याची घोषणा या वेळी डॉ. टेमगिरे यांनी केली.

यावेळी किशोर शेळके, रेश्मा साळुंखे, माजी सरपंच सुवर्णा रामदास दरेकर, सुनंदा दरेकर, स्नेहल भुजबळ, संगीता हरगुडे, ग्रामपंचायत सदस्या शशिकला सातपुते, ललिता दरेकर, तनुजा दरेकर, निकिता हरगुडे, ॲड. विजयराज दरेकर, सागर दरेकर, दत्तत्राय हरगुडे, युवराज दरेकर, राजेश भुजबळ, अक्षय कानडे, मोहन हरगुडे, नवनाथ दरेकर यांच्यासह ग्रामस्थ व कामगार उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!