सरपंच सुवर्णा रामदास दरेकर यांच्याकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करत वारकऱ्यांना विठ्ठल रुक्मिणीच्या एकावन्न मूर्ती भेट देत सकाळच्या काकडा महाप्रसादाचे आयोजन
कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये काकडा आरती समाप्ती व तुलसी विवाह सोहळा आनंदाच्या व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झालं यावेळी सरपंच सुवर्णा रामदास दरेकर व उद्योजक स्वरा डेव्हल्पर्सचे रामदास दरेकर यांच्यावतीने मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती तसेच याप्रसंगी एकावन्न वारकऱ्यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती भेट देण्यात आली.
कोजागिरी पौर्णिमेपासून मोठ्या भक्तिमय वातावरणात पहाटेचा काकडा आरती करण्यात येत होती यावेळी काकडा आरती समाप्ती व तुलसी विवाह सोहळ्या मोठ्या उत्साहाच्या व आनंदाच्या वातवणात पार पडला.यावेळी सरपंच सुवर्णा रामदास दरेकर व रामदास बबन दरेकर सपत्नीक यांच्या हस्ते पहाटे तीन वाजता श्री विठ्ठल रुक्मिणीं यांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला.
सरपंच सुवर्णा रामदास दरेकर यांनी रोज काकड आरतीला उपस्थित राहणाऱ्या वारकऱ्यांना श्री विठ्ठल रुक्मिणींच्या ५१ मूर्ती देऊन सर्व वारकऱ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सरपंच सुवर्णा दरेकर व रामदास दरेकर कुटुंबियांकडून सकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.त्याचप्रमाणे कीर्तनाच्या निमित्ताने आळंदी येथील धर्म शाळेतील मुलांना देखील निमंत्रित केले होते.
यानंतर दुपारी तीन वाजता श्रींच्या पालखी सोहळा मोठ्या उत्शा समापंन झाला त्यानंतर तुलसी विवाह पार पडला यावेळी ह.भ.प गोविंद महाराज गोरे कीर्तन झाले त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यकारी सप्ताह मंडळ, पांडुरंग भजनी मंडळ, श्री भैरवनाथ भजनी मंडळ, भैरवनाथ दिंडी मंडळ, अध्यक्ष,उपाध्यक्ष, सदस्य, वारकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.गावातील अनेक मान्यवर वारकरी महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.