कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर) येथील श्री समर्थ ज्वेलर्स बारामतीकर सराफ यांच्या ज्वेलर्स दुकानाचे आमदार अशोक पवार व सुजाता पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी सणसवाडी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार अशोक पवार यांनी सोन्याचा व्यवसाय करताना दर्जा व गुणवत्ता राखत लोकांच्या विश्वासाला जपत सेवा देणे गरजेचे असल्याचे सांगत सणसवाडी ग्रामस्थांना सोयीसुविधा व आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सणसवाडी येथे २०१५ मध्ये पहिल्या शाखेचे उद्घाटन आमदार पवार यांच्याच हस्ते करण्यात आले होते तर २०२३ मध्ये भव्य अशा दुसऱ्या शाखेचेही उद्घाटन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री समर्थ ज्वेलर्स बारामतीकर सराफ यांच्या ज्वेलर्स दुकानाच्या माध्यमातून भारत नारायण ढेकळे ,अशोक भारत ढेकळे, शेखर भारत ढेकळे यांनी उत्तम व दर्जेदार सेवा दिली असून सणसवाडी पंच क्रोशीतील नागरिकांचा विश्वास संपादन केल्याने अल्प कालावधीत घराघरात विश्वासाचे नाते तयार करत आकर्षक ,दर्जेदार ,गुणवत्तापूर्ण सोन्याचांदीचे दागिने व अलंकार देत विश्वसनीय सेवा देत नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.
या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी कांग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, खरेदी विक्री संघाचे राजेंद्र नरवडे पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, , पुणे मार्केट कमिटीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे , माजी पंचायत समिती सदस्य पि के गव्हाणे, सविता दरेकर , मनसेचे उपाध्यक्ष रामदास दरेकर, माजी सरपंच प्रफुल शिवले, सरपंच संगिता हरगुडे, उपसरपंच दत्तात्रय हरगुडे, विजयराज दरेकर, माजी सरपंच सुनंदा दरेकर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, अक्षय कानडे, राहुल हरगुडे, शशिकला सातपुते, ललिता दरेकर, सुवर्णा दरेकर, रूपाली दरेकर,माजी उपसरपंच उद्योजक हरीश येवले, चेअरमन भैरवनाथ दरेकर, रामदास दरेकर, नवनाथ दरेकर, माऊली थेऊरकर, सुहास दरेकर, रामभाऊ दरेकर, निलेश दरेकर, प्रशांत दरेकर, सूभाष दरेकर अशोक ढेरंगे, शाम दरेकर मयुर दरेकर, अशोक करडे अनिल गोटे आदी मान्यवर उपस्थित होते.