पुणे- दिनांक २६ सप्टेंबर
सायंकाळी घरी पूजा करत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यांना तातडीने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उद्या (मंगळवार दिनांक २७ सप्टेंबर) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी अंजली, मुलगा भावार्थ , मुलगी पद्मश्री जोशी व जावई धनंजय जोशी व नातवंडे ४ असा परिवार आहे.
शिरूर तालुक्यातील कारेगाव हे त्यांचे मूळ गाव होते.रामचंद्र अनंत देखणे १२ एप्रिल १९५६ रोजी जन्मलेले रामचंद्र अनंत देखणे हे संतसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक , लेखक , प्रवचनकार आणि भारुडकार म्हणून ओळखले जातात . त्यांच्या घरातूनच त्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा लाभली आहे . वडिलांच्या कीर्तनात ते लहानपणी अजाणतेपणी टाळकरी म्हणून उभे रहात आणि खड्या आवाजात अभंगातली सुमधुर चरणे म्हणत गोड चाली लावत. त्यामुळे कीर्तन, प्रवचन, भजन आणि भारूड या कला प्रकारांशी ते आपोआप जोडले गेले. गावच्या जत्रेत किंवा पालखी, दिंडी सोहळ्यात रामचंद्र देखणे वेगवेगळी सोंगे आणून भारुडे करू लागले. ग्रामीण भागातील लोकसंस्कृती आपल्या व्याख्यान ,कीर्तन व भारुडातून मांडू लागले ,लोकसंस्कृतीचा जागर अव्याहतपणे सुरू ठेवला.
’भारुड वाङमयातील तत्त्वज्ञान – संत एकनाथांच्या संदर्भातल्या या त्यांच्या प्रबंधास इ.स. १९८५ मध्ये पुणे विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्राप्त झाली आहे. या प्रबंधाला डॉ. मु.श्री. कानडे पुरस्कार समितीचा पुरस्कार मिळाला होता.विविध विषयांवर व्याख्यानेडॉ. रामचंद्र देखणे हे उत्तम वक्ते होते. त्यांनी महाराष्ट्रभर व महाराष्ट्राबाहेर विविध विषयांवर अनेक व्याख्याने दिली. देशविदेशांत त्यांनी भारुडाचे कार्यक्रम केले. त्यांच्या २१०० व्या भारुडाचा कार्यक्रम १४ मे २०१६ रोजी झाला होता.
संत साहित्यावरील लेखन -संत साहित्यावर डॉ. देखणे यांनी पुष्कळ लेखन केले. यामध्ये प्रामुख्याने ‘अंगणातील विद्यापीठ’, ‘आनंद तरंग’, ‘आनंदाचे डोही’, ‘आषाढी’, ‘भारुड आणि लोकशिक्षण’, ‘दिंडी’, ‘तुका झालासे कळस’, ‘तुका म्हणे जागा हिता’,’ महाकवी’ अशी डॉ. देखणे यांची ३८ ललित, संशोधनपर आणि चिंतनात्मक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.डॉ रामचंद्र देखणे यांची ग्रंथसंपदा -अंगणातील विद्यापीठ,आनंद तरंग,आनंदाचे डोही,आषाढी,गोंधळ : परंपरा स्वरूप आणि अविष्कारगोरज,जीवनयोगी साने गुरुजी,जीवनाची सुंदरतातुका म्हणे जागा हिता,तुका झालासे कळस, दिंडी, भारूड आणि लोकशिक्षण,भारूड वाङ्मयातील तत्त्वज्ञानभूमिपुत्र,मनाचे श्लोक : जीवनबोध (ई-पुस्तक),मराठी बोलू कौतुके या ग्रंथातील ’लोककाव्य आणि मराठी भाषा’ हा लेख, महाकवी,महाराष्ट्राची सांस्कृतिक लोककला,लागे शरीर गर्जायालोकशिक्षक गाडगेबाबा,वारी : स्वरूप आणि परंपरा, शारदीचिये चंद्रकळा,श्रावणसोहळा,संत साहित्यातील पर्यावरणविचार,समर्थांची भारुडे (ई-पुस्तक),साठवणीच्या गोष्टी,सुधाकरांचा महाराष्ट्र,हौशी लख्याची, ज्ञानदीप लावू जगीरामचंद्र देखणे यांची ललित, संशोधन आणि चिंतनात्मक अशी ३८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
१) Jesse Russell व Ronald Cohn आणि २) Lambert M. Surhone, Mariam T. Tennoe व Susan F. Henssonow यांनी रामचंद्र देखणे यांचीे चरित्रे लिहिलीे आहेत.