Wednesday, November 20, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रश्री क्षेत्र पंढरपूर येथे रंगला वारकऱ्यांचा कार्तिकी एकादशी सोहळा

श्री क्षेत्र पंढरपूर येथे रंगला वारकऱ्यांचा कार्तिकी एकादशी सोहळा

पुणे – पंढरपूर

कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी श्री क्षेत्र पंढरपूर येथे दाखल झाल्याने अवघी पंढरी भक्तीमय झाली आहे. वैष्णवांच्या मेळाव्याने अवघी पांढरी विठू नामाच्या जयघोषाने दुमदुमली आहे. विठ्ठल मंदिरावर आकर्षक पुष्प सजावटी सह मंदिराच्या मुख्य भागात गुलाब पुष्पातील विठ्ठलाची प्रतिकृती साकारली असून मंदिराला मनमोहक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली.

कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होऊन विठुरायाच्या दर्शनाचे समाधान मिळवण्यासाठी राज्यासह इतर राज्यातून वारकरी दाखल झाले आहेत . कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली तर यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद येथील शिरोड खुर्द गावातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी फलक लावण्यात आले होते.

कार्तिकी एकादशी निमित्ताने (Pandharpur) पंढरपुरात आधी चंद्रभागेचे स्नान मग विठ्ठल दर्शन या परंपरेनुसार चंद्रभागेवर पहाटेपासून स्नानासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी केल्याने चंद्रभागा वाळवंट भाविकांनी फुलून गेले होते. चंद्रभागा नदीवर स्नानासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली होती चंद्रभागा नदीला पाणी पातळी योग्य प्रमाणात असल्याने वारकऱ्यांना चंद्रभागा स्नान सुरक्षितपणे करता आले.

राज्यभर झालेल्या परतीच्या पावसाचा सर्वात मोठा फटका यंदाच्या कार्तिकी यात्रेला बसला असून यात्रेकरूंच्या संख्येत मोठी घट झाल्याचे चित्र आहे.आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची कार्तिकीला पाठ फिरवल्याचे चित्र होते. यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांनी मल भरला होता पण अपेक्षित गर्दी नसल्याने व्यापारी चिंताग्रस्त दिसले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!