Wednesday, November 20, 2024
Homeक्राइमशेतीच्या वादातून काकानेच केले पुतण्यावर तलवारीचे वार...

शेतीच्या वादातून काकानेच केले पुतण्यावर तलवारीचे वार…

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतीच्या वादातून घरातील व्यक्तींचा वादविवाद झाला. वादामध्ये चिडलेल्या काकानेच पुतण्यावर तलवारीनं  हल्ला केला असून इतर जन चुलत्याला आवरण्याचा प्रयत्न करत आहेत पण चुलता खाली पडलेल्या पुतण्यावर तलवारीचे वार करतना दिसत आहे.(The uncle stabbed his nephew with a sword due to a farm dispute…)

    या घटनेनं मोठ्या प्रमाणावर  खळबळ उडाली असून वाळूंज औद्योगिक परिसरातल्या वडगाव कोल्हाटी येथील ही घटना आहे. ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.( Crime News)

शेतीच्या वादातून दोन गटात जोरदार राडा झाला. वावरामध्ये जमालेल्यांमध्ये आठ पुरुष व एक महिला होती यावेळी पुढे चाललेल्या चुलत्याला पुतण्या पट्ट्याने मारण्यासाठी धावून गेला असताना चुलत्याने मागे फिरत तलवारीने घाव घातला यात पुतण्या जमिनीवर पडला त्याला वाचवण्यासाठी इतरांनी धावाधाव केली पण हातात तलवार असलेल्या चुलत्याने पाच घाव घातले असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे.(Crime News)

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शेतीच्या वादातून दोन गटात जोरदार राडा झाला. वावरामध्ये जमालेल्यांमध्ये आठ पुरुष व एक महिला होती यावेळी पुढे चाललेल्या चुलत्याला पुतण्या पट्ट्याने मारण्यासाठी धावून गेला असताना चुलत्याने मागे फिरत तलवारीने घाव घातला यात पुतण्या जमिनीवर पडला त्याला वाचवण्यासाठी इतरांनी धावाधाव केली पण हातात तलवार असलेल्या चुलत्याने पाच घाव घातले असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे

या प्रकरणी राजेश तुकाराम साळे, वय ३५ वर्षे रा. गट न.८६ अयोध्या नगर वडगाव कोल्हाटी यांच्या फिर्यादीवरून मुकेश उर्फ बबलू त्रिंबक साळे, अभिषेक त्रिंबक साळे, ऋषिकेश त्रिंबक साळे, त्रिंबक आसाराम साळे रा. वडगाव कोल्हाटी ता.जि छपत्रती संभाजीनगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना गट नंबर ५९,लाल माती, सीता नगर वडगाव कोल्हाटी येथे २० जुलै रोजी आकरा वाजता घडली आरोपींनी संगनमत करुन फिर्यादीला, त्याच्या भावाला व पुतण्याला जमिनीच्या वादावरून तलवारीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने व गंभीर जखमी केल्याने हल्ल्यात दोन्ही गटाचे सहा जण जखमी झाले असून परस्परविरोधी आठ जणांवर वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वावळे , पोलिस उपनिरीक्षक इंगोले हे करत आहे.


संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!