दौंड व शिरूर उपविभागातील ११ गुन्हे उघडकीस , एकूण ५ ,६७,७०० / – रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश
यवत गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय व गौरवास्पद कामगिरी
पुणे – दिनांक २६ जुलै शिरूर हवेली तालुक्यात शेतकऱ्यांच्या डी.पि चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे व शेतीचे नुकसान होत होते. शिरूर व हवेली तालुक्यातील पारगाव , कोरेगाव भिवर , मिरवडी मेमाणवाडी , करंदी , आपटी , डिंग्रजवाडी , वाघाळे , भांबर्डे , गणेगाव खालसा , शिरुर , रांजणगाव , शिक्रापुर व यवत पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण ११ रोहित्र ( डीपी ) चोरीचे गुन्हे झाले होते .याबाबत पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक व पोलीस कर्मचारी आरोपींचा कसून शोध घेत होते. सदर गुन्हेयाबाबत पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे अचूक दिशेने व तातडीने फिरवली व शिरूर – हवेली तालुक्यात डीपी,तारा साहित्य चोरी करणाऱ्या राहुरी येथील मामा टोळीला बेड्या ठोकण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले असून मामा टोळीकडून ११ गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपी मामा ऊर्फ मुख्तार देशमुख टोळीकडून दौंड व शिरूर उपविभागातील ११ विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून एक काळ्या रंगाची स्कार्पिओ गाडी क्रं एम.ए ४६ ऐ ०२३२ , तसेच ११० किलो अल्युमिनियमच्या तारा , ३५० किलो तांब्याच्या तारा व तांब्याचे त्रिकोणी ठोकळे , असा एकूण ५,६७,७०० /– रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
दिनांक १० जून रोजी मौजे पारगाव , ता . दौंड , जि . पुणे येथील शहाजी रघुनाथ रूपनवर व युवराज बोत्रे यांच्या शेतातील ट्रान्सफॉर्मर डीपी व एकूण २८० किलो वजनाच्या ॲल्युमिनियम तारा चोरून नेल्याबाबत यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिनांक १९ जुलै रोजी यवत पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार निलेश कदम , गुरुनाथ गायकवाड , अक्षय यादव , मारुती बाराते यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , राहुरी जि . अहमदनगर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे मामा उर्फ मुक्तार गफुर देशमुख , रा . राहुरी , जि . अहमदनगर हा त्याचे टोळीतील साथीदाराकडुन विद्युत ट्रान्सफार्मर डीपी चोरीचे गुन्हे करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने यवत पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने राहुरी परिसरात राहुरी पोलीस स्टेशनचे पो.कॉ नदीम शेख यांचे मदतीने राहुरी मुलन माथा या ठिकाणी वेषांतर करुन सापळा रचुन आरोपी १ ) मामा उर्फ मुक्तार गफुर देशमुख , २ ) विशाल अर्जून काशीद , ३ ) अभिषेक गोरख मोरे , सर्व रा . राहुरी , जि . अहमदनगर यांना स्कॉरपिओ गाडीसह ताब्यात घेउन विचारपुस केली असता सदर संशयितांनी त्यांचे इतर साथीदारांचे मदतीने पारगाव , कोरेगाव भिवर , मिरवडी मेमाणवाडी , करंदी , आपटी , डिग्रजवाडी , वाघाळे , भांबर्डे , गणेगाव खालसा , शिरुर , रांजणगाव , शिक्रापुर , यवत पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण ११ रोहित्र ( डीपी ) चोरीचे गुन्हे केलेचे सांगत सदर चोरीतील अल्युमिनियम व तांब्याच्या तारा श्रीरामपूर येथील भंगार व्यावसायिक फिरोज रझाक शेख यास विक्री केल्याने मामा टोळीसह भंगार व्यावसायिकाला बेड्या ठोकल्या आहेत
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ . अभिनव देशमुख , बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते , दौंड उपविभागीय अधिकारी राहुल धस , यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार , पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे , निलेश कदम , गुरू गायकवाड ,अक्षय यादव , रामदास जगताप , मारूती बाराते , राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख , सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सचिन गायकवाड , पोलीस कॉन्स्टेबल सुनिल कोळी यांनी केली . मामा टोळीला बेड्या ठोकल्या असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या डिपी व इतर साहित्य चोरी करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कार्यवाही झाल्याने शेती व शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या चोरांना वचक बसणार आहे