वाजेवाडी येथे तातडीने पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी.चार वासरांचा मृत्यू नक्की कशाने ? वनविभागाने पंचनामा केला नाही, कारण ते वनविभागाचे काम नाही वनविभागाच्या अधिकारी सांगत असून बिबट्यांच्या मुक्त फिरण्याने ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे.
कोरेगांव भीमा – वाजेवाडी (ता.शिरूर) येथे दोन बिबटे ( एक मादी व तिची तीन पिल्ले)मुक्तपणे कुठेही फिरत असून महिला व नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असून चार वासरांचा मृत्यू नक्की कशाने झाला ? याबाबत शंका निर्माण झाली असून वनविभागाने पंचनामा केला नाही, कारण ते वनविभागाचे काम नाही असे वनविभागाचे वनपाल सांगत असून बिबट्यांच्या मुक्त फिरण्याने ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे. यामुळे शिरूर वनविभागाच्या ( Shirur Forest Division)कर्तव्यदक्ष आशीर्वादाने वाजेवाडी ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे दिसत आहे.(With the blessings of Shirur Forest Department, the free movement of Wajewadi leopards play with the lives of villagers)
वाघाने चार वासरांची शिकार Leopard attack)केली की नाही हे पंचनामा झाल्याशिवाय कळणार नाही ? त्याबाबत आवश्यक स्थळपाहनी करत पुरावे तपासत पंचनामा केल्याशिवाय सत्य परिस्थीती समोर येणार तरी कधी ? त्यामुळे पंचनामा होणे अत्यावश्यक असून वनपाल या हे आमचे काम नसून त्याला बिबट्याने जखमी केले की जखमीच आणून टाकले आहे हे माहीत नाही.आमचा कर्मचारी तेथे गेला होता आणि पंचनामा नाही असे सांगितले.(With the blessings of Shirur Forest Department, the free movement of Wajewadi leopards play with the lives of villagers.)
वाजेवाडी येथील तंटामुक्ती अध्यक्ष व माजी सैनिक ज्ञानेश्वर दत्तोबा वाजे यांनी शेतात पंधरा दिवसांपूर्वी बिबट्या पाहिला होता. पूजा गणेश वाजे यांना सकाळी चालण्यासाठी गेल्या आता अवघ्या वीस फुटांवर बिबट्या दिसला त्यामुळे महिला प्रचंड दहशतीखाली आहेत. अनिल निंबराज वाजे या शेतकऱ्याला संध्याकाळी साडेसातला गावच्या रस्त्याच्या बाजूलाच बिबट्या दिसला , एका शेतात शेतकऱ्याला पन्नास फुटावर तर बाळासाहेब रंगनाथ वाजे शेतकऱ्याला चारशे मीटर अंतरावर बिबट्या दिसला यामुळे नागरिकांना वारंवार बिबट्या दिसत असून सकाळी मॉर्निंग वॉक, दैनंदिन कामे, शेतीतील कामे करता येत नसून अगदी करायची तर जीव मुठीत धरून कामे करावी लागत आहे. याबाबत वन विभागाला जाग तरी कधी येणार नागरिकांच्या जीविताबद्दल काही करणार आहे का नाही ? असा उद्विग्न प्रश्न निर्माण होत आहे(With the blessings of Shirur Forest Department, the free movement of Wajewadi leopards play with the lives of villagers.)
वाजेवाडी ग्रामस्थांनी तातडीने पिंजरा बसवण्याची मागणी केली असून वन विभागाच्या करभाराबाबत प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे.
गेली आठ ते नऊ महिने वाजेवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. याबाबत झोपित असलेले कर्मचारी व अधिकारी एखादी दुर्दैवी घटना घडण्याची वाट पाहत आहेत की काय दुर्दैवी घटना घडू नये यासाठी परिसरात दोन ते तीन पिंजरे लावण्यात यावे तसेच एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला आहे. - देविदास भोर ग्राम पंचायत सदस्य वाजेवाडी
वाजेवाडी ग्राम पंचायतीच्या वतीने पिंजरा लावण्याबाबत पत्र व्यवहार करण्यात आला असून शिरूर वन विभाग तातडीने पिंजरा बसवणार की नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ पाहत राहणार अस प्रश्न उपस्थित होत असून वनविभागाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ होतो की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.(Shirur Forest Division)
वाजेवाडी येथे चार वासरांचा मृत्यू झाला असून वासरे नक्की कशाने मृत्यू पावली आहे याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात(Leopard attack )वासरे मृत्यू मुखी पडली की अज्ञाताने घातपात केला की इतर कारणांनी त्यांचा मृत्यू झाला हे स्पष्ट झाले नसून याप्रकरणी दुपारी वनविभागाला कळवले असता रात्री नऊला वनविभागाचा कर्मचारी भेट देऊन तोंडी चौकशी करून परत गेले आहेत त्यामुळे नागरिकांच्या जीविता बाबत वनविभागाची काळजी व कार्यतत्परता दिसून येत आहे.
चार गोवंश वासरे मृत्यू पावले असून चार जिवंत आहे त्यामुळे ही वासरे कोणी आणली , येथेच का सोडली त्यांच्या मृत्यूमागील कारण शोधणे अत्यंत गरजेचे असून यामागे मोठे गोमांस विक्री करणारे रॅकेट आहे की ?? मोठी दलाल यंत्रणा आहे हे स्पष्ट व्हायला हवे की याला कोणाचा वरदहस्त आहे हेही समजण्यासाठी वासरांचा पंचनामा व उत्तरीय तपासणी होणे गरजेचे आहे आता तरी याबाबत वन विभाग कार्यवाही करणार की भूमिका घेऊन जिवितशी होणारा खेळ पाहत राहणार .
या वासरांचा मृत्यू बिबट्याने शिकार केल्याने की कत्तल इतर कारणाने झाला हे स्पष्ट होणे गरजेचे आहे (With the blessings of Shirur Forest Department, the free movement of Wajewadi leopards play with the lives of villagers)
वाजेवाडी येथील वासरांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालं आहे. वाजेवडी येथे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पिंजरा लावण्यात येईल.
– वनरक्षक दहातोंडे
वाजेवाडी येथील चार वासरांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येऊन तातडीने पिंजरा लावण्यात येणार आहे तसेच जे कोणी कर्तव्यात दिरंगाई केली असल्यास त्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
– जगताप साहेब वनविभाग वन क्षेत्रपाल अधिकारी, शिरूर